नवी दिल्ली : तेल उत्पादक कंपन्यांनी गुरुवारी इंधन दरवाढीला ब्रेक दिल्यानंतर शुक्रवारी इंधनाच्या दरांत वाढ केली आहे. देशातील विविध शहरांमध्ये पेट्रोल 28-29 आणि डिझेल 28-30 पैशांनी वाढलं आहे. देशाच्या राजधानीमध्ये म्हणजेच दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 95.85 आणि 86.75 रुपयांवर पोहोचलं आहे. मुंबईतही पेट्रोलच्या दरांनी विक्रमी उंची गाठली आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये पेट्रोल तब्बल 102.04 रुपये प्रतिलीटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलचे दर 94.15 रुपये प्रतिलीटरवर पोहोचलं आहे. 


मागील 11 दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर प्रतिलीटरमागे 1.70 रुपयांनी वाढले आहेत. 


देशात 15 जून  2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात. 


India Rains : पुढल काही दिवस भारतातील पूर्व, मध्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता : आयएमडी 


भारतात केंद्राचा 33 तर राज्याचा 32 रुपये कर


सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. आता यावरच कर थांबत नाही. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत. 


पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx   पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.