Petrol-Diesel Price Hike : देशात दिवसागणिक इंधन दर वाढीचं सत्र सुरुच आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी देशात आतापर्यंतचा उच्चांक गाठल्याचं दिसून येतंय. मुंबईमध्ये आज पेट्रोलच्या दरात 24 पैशांची वाढ झाली असून ते 108.19 रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेलच्या दरात 32 पैशांची वाढ झाली असून ते 98.16 रुपयांवर पोहोचलं आहे. राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे हे दर सर्वोच्च असून आता डिझेलही लवकरच शंभरी पार करण्याची लक्षणं आहेत.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 25 पैशांनी तर डिझेलची किंमत 30 पैशांनी वाढली. दिल्लीत आज पेट्राल 102.14 रुपये तर डिझेल 90.47 रुपये दराने विक्री होत आहे.
देशातील महत्त्वाच्या शहरांमधील दर :
देशातील महत्त्वाची शहरं | पेट्रोल रुपये/लिटर | डिझेल रुपये/लिटर |
दिल्ली | 102.14 | 90.47 |
मुंबई | 108.19 | 98.16 |
कोलकाता | 102.74 | 93.54 |
चेन्नई | 99.76 | 94.99 |
पेट्रोल-डिझेल GSTमध्ये घेण्यासाठी का तयार नाही केंद्र आणि राज्य सरकार?
केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी (GST) लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का? यामुळे काय फायदा होणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं...
पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus Updates : गेल्या 24 तासात देशात 24 हजार रुग्णांची नोंद तर 234 जणांचा मृत्यू
- Gandhi Jayanti : महात्मा गांधी केवळ 'देशभक्त', शांतीचे दूत नाहीत; पाच वेळा नामांकन होऊनही गांधींना शांतीचा नोबेल का नाकारण्यात आला?
- कोरोना काळात नोकरी गमावणाऱ्या राज्य कर्मचारी विमा निगमच्या सदस्यांना मिळणार तीन महिन्यांचा पगार, केंद्र सरकारचा निर्णय