Petrol Diesel Price Today 30 June 2022 :  तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकनं पुरवठा वाढवण्याचे संकेत दिले आहेत, तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता असल्यानं इंधनाचा वापर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारणांमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाची (Crude Oil) किंमत 3 डॉलरनी कमी झाली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) किरकोळ दर जाहीर केले आहेत. 


आज सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 116 डॉलर इतकी होती, जी एका दिवसापूर्वीच्या तुलनेत सुमारे 3 डॉलरनी कमी आहे. दरम्यान, आज जाहीर झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांत सरकारी तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनी क्रूडच्या महागाईमुळे स्वतःचे नुकसान होत असल्याचे सांगितले आहे आणि इंधनाच्या किमती वाढवण्यासाठी त्यांच्यावर सतत दबाव आणला जात आहे.


मुंबई, दिल्लीतील पेट्रोल-डिझेलचे दर काय? 


देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे.


महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय? 


महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर आहे.


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).