Petrol Diesel Price Today 23 November 2022: गेल्या 24 तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती प्रति बॅरल सुमारे एक डॉलरनं घसरल्या आहेत. जर आपण कच्च्या तेलाबद्दल बोललो तर गेल्या 24 तासांत त्यांच्या किंमती देखील 1 डॉलरहून जास्त वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 88.36 डॉलरवर पोहोचली आहे. तसेच, WTI देखील सुमारे 2 डॉलरची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि ते प्रति बॅरल  81.26 डॉलरनं विकलं जात आहे.


एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशात सलग 183व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत यापूर्वी 22 मे रोजी देशातील चार महानगरांमध्ये झाला होता. जवळपास सहा महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, 22 मे 2022 रोजी सरकारनं उत्पादन शुल्क कमी केलं होतं, त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं होतं. 


देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर



  • दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

  • मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर


जगभरात उद्भवणार डिझेलचं संकट?


गेल्या काही महिन्यांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाकडून डिझेलचा पूरवठा कमी करण्यात आलाय. यामुळे मार्च 2023 मध्ये डिझेलचे संकट आणखी गडद होऊ शकते. जागतिक निर्यात बाजारात डिझेलचे इतके संकट आहे की पाकिस्तानसारख्या गरीब देशांना देशांतर्गत गरजांसाठी देखील डिझेल मिळत नाही. बेंचमार्क असलेल्या न्यूयॉर्क हार्बरच्या स्पॉट मार्केटमध्ये या वर्षी डिझेलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत.  


जगभरातील इंधन शुद्धीकरण क्षमतेत घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबतही समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात मागणी कमी झाल्यानंतर रिफायनिंग कंपन्यांनी त्यांचे कमी नफा देणारे अनेक प्लांट बंद केले. 2020 पासून  यूएस शुद्धीकरण क्षमता प्रतिदिन एक दशलक्ष बॅरलने कमी झाली आहे. तर युरोपमध्ये  कामगारांच्या संपामुळे रिफायनिंगवर परिणाम झाला आहे. रशियाकडून पुरवठा बंद झाल्यानंतर अडचणी आणखी वाढणार आहेत. युरोपीय देश डिझेलवर सर्वाधिक अवलंबून आहेत. फेब्रुवारीमध्ये, युरोपियन युनियनच्या सागरी मार्गांनी रशियाला वितरणावर बंदी लागू होईल. मात्र रशियातून येणाऱ्या पुरवठ्याला पर्याय न मिळाल्यास युरोपीय अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. 


तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या, एका क्लिकवर 


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).