Petrol-Diesel Price Today 18th November : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil) अस्थिरता दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत वाढली होती. मात्र कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड घसरलं असून प्रति बॅरल 85.29 डॉलरवर पोहोचलं. तसेच, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 92.86 डॉलरवर पोहोचलं आहे. 


पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतील (Petrol-Diesel Price) शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकारनं 22 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केलं होतं. त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं होतं. यानंतर महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर नव्या सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.


देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर? 


आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. त्यापाठोपाठ कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.


तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) दररोज सकाळी 6 वाजता क्रूडच्या किमतीवर आधारित तेलाचे दर जारी करतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरांत काही बदल झाल्यास त्याची अंमलबजावणी त्याच वेळी केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे असल्यानं देशातील प्रत्येक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात.


तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या, एका क्लिकवर 


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).