नवी दिल्ली : दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागत आहे. सतत वाढत्या तेलाच्या किंमतींपासून जनतेला दिलासा मिळालेला नाही. आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 35 पैशांनी महागले आहे.
वाढलेल्या दरांसह आज दिल्लीत पेट्रोल 99.16 रुपये प्रति लिटर झालं आहे. तर डिझेलच्या किंमतीती कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीत डिझेल 89.18 रुपये प्रति लिटर विकण्यात येत आहे.
देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किंमती
मुंबईत आज पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 96.30 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये आज पेट्रोल 98.99 रुपये आणि डीझेल 92.03 रुपये प्रति लिटर
चेन्नईत आज पेट्रोल 100.15 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लीटर
नवी दिल्लीमध्ये आज पेट्रोल 99.16 रुपये आणि डिझेल 89.18 रुपये प्रति लिटर
पेट्रोलियम उत्पादनांवरील करांतून केंद्र सरकारची भरघोस कमाई
आरटीआयच्या माध्यमातून ही बाब उघडकीस आली आहे की, कोरोना कालावधीत पेट्रोलियम उत्पादनांवरील कस्टम आणि अबकारी शुल्कातून मिळणारी केंद्रसरकराची कमाई 56 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. अप्रत्यक्ष करातून सुमारे 2.88 लाख कोटी रुपये सरकारने मिळाले आहेत.
2020-21 मध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवर 37 हजार 806 कोटी रुपयांची कस्टम ड्युटी वसूल केली गेली. तर सेंट्रल एक्साईज ड्यूटीमधून 4.13 लाख कोटी सरकारला मिळाले. तर पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीत कस्टम ड्युटी म्हणून 46 हजार कोटी वसूल करण्यात आले.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात तक्रार
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील न्यायालयात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पेट्रोलियम उत्पादक देशांमध्ये कच्च्या तेलाची कमी किंमत असूनही एका षडयंत्रांतर्गत पेट्रोल आणि डिझेल जास्त किंमतीला विकल्या गेल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि तक्रारदार तमन्ना हाशमी यांनी केला आहे.
देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्त्वाच्या इतर बातम्या :