Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात होत असलेल्या दर कपातीचा फायदा भारतीय ग्राहकांना मिळताना दिसत नाही. जवळपास महिनाभरापासून तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांमधील इंधर दर स्थिर आहेत.
राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या महानगरांमध्ये सोमवारीदेखील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिलेत. दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 86.67 प्रतिलीटर आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे 109.98 प्रतिलीटर आणि 94.14 प्रतिलीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 104.67 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 89.79 रुपये प्रतिलीटर तर कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 101.40 रुपये आणि 91.43 रुपये आहेत.
पुणे, औरंगाबाद, नागपूरमध्ये काय दर?
पुण्यातही इंधन दर स्थिर आहेत. पेट्रोलचा दर प्रतिलीटर 110.71 इतका आहे. तर, डिझेल 93.45 रुपये प्रतिलीटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल दर 111.64 रुपये प्रतीलीटर इतके असून डिझेलचे दर 95.79 रुपये प्रतिलीटर इतके आहेत. नागपूरमध्ये पेट्रोल दर 109.71 रुपये प्रतिलीटर इतका असून डिझेलची किंमत 92.53 रुपये प्रतिलीटर इतकी आहे. नागपूरमध्येही इंधन दर स्थिर राहिले आहेत.
मागील महिन्यात केंद्र सरकारने उत्पाद शुल्कात काही प्रमाणात कपात केली होती. तर, इतर राज्य सरकारांनी व्हॅटमध्ये कपात करत इंधन दर शंभर रुपयांसाठी आणण्याचा प्रयत्न केला.
- Fuel Price : जगातील 'या' शहरांमध्ये मिळतेय सर्वात महाग पेट्रोल; भारतातील कोणतं शहर?
- Fuel Price : क्रूड ऑइलच्या दरात घट, तरीही भारतात इंधन दर का घटेना? जाणून घ्या कशी होईल दर कपात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha