मुंबई: येत्या नव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरभक्कम वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं बजेट केवळ कोलमडणारच नाही, तर गाडी चालवायची की नाही याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे.


पश्चिम आशियाई देशातल्या तणावामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव खूपच वधारले आहेत. त्यामुळे भारतातील पेट्रोलचे दर 30 टक्कांनी वाढून ते शंभरच्या घरात पोहचण्याची चिन्हं आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाच्या भाववाढीचा फायदा रशिया, कोलंबिया, मलेशिया आणि ब्राझीलसारख्या देशांना होईल. तर चीन, भारत, इंडोनेशिया, थायलंड, दक्षिण अफ्रिका आणि तुर्कीसारख्या देशांना मात्र याची झळ बसणार आहे.

येमेनमधल्या बंडखोरांचा समाचार घ्यायला सौदी अरेबिया युद्धात उतरण्याची शक्यता आहे आणि तसे झाले, तर सौदी अरेबिया इराणच्या विरोधात उभे ठाकेल. या पार्श्वभूमीवर तेलाचे भाव गगनाला भिडण्याची चिन्हं जास्त आहेत.

केंद्रात मोदी सरकार सत्तारुढ झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली. एकवेळ अशी होती की हे दर अवघ्या २४ डॉलर प्रतिबॅरलवर आले होते. पण आता मध्यपूर्वेतल्या तणावामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या बॅरलचे भाव ८० डॉलर्सच्या आसपास आहेत. येणाऱ्या काळात त्यात ३० टक्के वाढ होऊन ते १०० डॉलर्सच्या पार जातील असा अंदाज नोमुरा या आर्थिक विश्लेषक कंपनीने व्यक्त केलाय.

  • सध्या भारतात पेट्रोलचा दर ७७ रूपयांच्या आसपास आहे.

  • तो १०० रूपये पार होण्याची शक्यता आहे.

  • डिझेलच्या दरातली वाढही लक्षणीय असेल.

  • परिणामी अन्नधान्य, भाजीपाला, प्रवास मोठ्या प्रमाणात महागण्याची शक्यता आहे.


तेलाच्या भाववाढीचा फायदा रशिया, कोलंबिया, मलेशिया आणि ब्राझीलसारख्या देशांना होईल. तर चीन, भारत, इंडोनेशिया, थायलंड, दक्षिण अफ्रिका आणि तर्कीसारख्या देशांना मात्र याची झळ बसणार आहे. येमेनमधल्या बंडखोरांचा समाचार घ्यायला सौदी अरेबिया युद्धात उतरण्याची शक्यता आहे आणि तसे झाले, तर सौदी अरेबिया इराणच्या विरोधात उभे ठाकेल. या पार्श्वभूमीवर तेलाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

पश्चिम आशियाई देशातल्या या तणावाचा थेट परिणाम जागतिक बाजारातील तेलाच्या भावावर होण्याची शक्यता आहे. परिणामी, जगभरात महागाईदेखील वाढेल, अशी भीती ‘नोमुरा’ने आपल्या अहवालात व्यक्त  केली आहे. त्यामुळे आधीच अडचणींनी घेरलेल्या मोदी सरकारची डोकेदुखी वाढणार हे निश्चित.