मुंबई :  पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन नागरिक हैराण झाले असताना गेल्या काही दिवसात त्यांना दिलासा मिळाला आहे. देशात सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केलं जातंय. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 97.57 रुपये इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 88.60 रुपये इतकी आहे. दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे 91.17 आणि 81.47  रुपये इतकी आहे. 


सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. आता यावरच कर थांबत नाही. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.


देशातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर
मुंबई
पेट्रोल- 97.57 रुपये/लिटर
डिझेल- 88.60 रुपये/लिटर


दिल्ली 
पेट्रोल- 91.17 रुपये/लिटर
डिझेल- 81.47 रुपये/लिटर



उल्हासनगरच्या व्यापाऱ्याची भन्नाट आयडिया, एक हजार रुपयांच्या खरेदीवर एक लीटर पेट्रोल देणार फ्री!


कोलकाता
पेट्रोल- 91.35 रुपये/लिटर
डिझेल- 84.35 रुपये/लिटर


चेन्नई
पेट्रोल- 93.11 रुपये/लिटर
डिझेल- 86.45 रुपये/लिटर


देशात 15 जून  2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात. 


पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरhttps://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर तीन सोप्या पद्धतीने पाहता येतील.


तुम्ही तुमच्या जिल्हाचं, तालुक्याचं लोकेशन सिलेक्ट करुन किंवा पेट्रोल पंपाचं नाव https://associates.indianoil.co.in/PumpLocator/ या लिंकवर टाकून इंधनाचे दर काय आहेत याची माहिती घेऊ शकता.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)


इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.



वर्धापनदिनी मनसेकडून पेट्रोल-डिझेलवर 15 रुपयांची सूट, मुंबईच्या वडाळ्यात मनसेचा अनोखा उपक्रम