नवी दिल्ली: नोटा जमवण्याचा छंद अनेकांना असतो. पण आता हाच छंद एका व्यक्तीच्या अंगलट आला आहे. चंदीगडच्या सेक्टर 50मधील नरिंदर पाल सिंह यांनी 1989 पासून 786 क्रमांकाच्या अनेक नोटा जमा केल्या आहेत. त्यांच्याकडे 500 आणि 1000 रुपयांच्या तब्बल 4.5 लाख किंमतीच्या नोटा आहेत.


500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आजवर जमा केलेल्या या नोटा आता नरिंदर यांना बँकेत जमा कराव्या लागणार आहेत. 2001 साली पहिल्यांदा त्यांनी लिम्का बुकमध्ये आपल्या या विक्रमाची नोंद केली होती. पण आता त्यांना हे सर्व विक्रमापासून स्वत:ला वेगळं करावं लागणार आहे.

नरिंदर पाल यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे 786 क्रमांकाचे 500 रुपयांच्या 400 हून अधिक नोटा आहेत. तर 1000 च्या 130 नोटा आहे. पण आता आपण नवा विक्रम करण्याची तयारी केली आहे. 786 क्रमांकाची 2000 रुपयांची नोट मिळवली आहे. असं त्यांनी सांगितलं.

सध्या त्यांना या सर्व नोटा बँकेत जमा कराव्या लागणार आहेत. पण आपला छंद जपण्यासाठी ते पुन्हा नव्यानं सुरुवात करत आहेत.