Tomato Price: टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे हैराण झालेल्या लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता तुम्ही घरबसल्या ऑनलाइन स्वस्त टोमॅटो खरेदी करू शकता. खरं तर, सरकारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ONDC ने 22 जुलैपासून दिल्लीतील लोकांना स्वस्तात टोमॅटो उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. तुम्ही ONDC वर फक्त 70 रुपये प्रति किलो दराने टोमॅटो खरेदी करू शकता. ओएनडीसीचे व्यवस्थापकीय संचालक टी. कोशी यांनी ही माहिती दिली.


केंद्र सरकार गेल्या आठवड्यापासून, 14 जुलैपासून देशभरात विविध ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे टोमॅटोची सवलतीच्या दरात विक्री करत आहे. सरकारच्या कृषी विपणन संस्था नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED) आणि नॅशनल कंझ्युमर कोऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) त्याची विक्री करत आहेत.


2 किलोपेक्षा जास्त टोमॅटो खरेदी करू शकत नाही


NCCF द्वारे ONDC प्लॅटफॉर्मवर लोकांना सवलतीच्या दरात टोमॅटो विकले जात आहेत. एनसीसीएफकडून टोमॅटोची पुढील 10 ते 15 दिवस ओएनडीसीवर 70 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जाईल. वापरकर्ता जास्तीत जास्त 2 किलो टोमॅटो फक्त ONDC वरून ऑर्डर करू शकतो.


22 जुलैपासून दिल्लीत 70 रुपये प्रतिकिलो दराने विक्री


एनसीसीएफ आणि नाफेडने खरेदी केलेले टोमॅटो सुरुवातीला 90 रुपये किलो दराने विकले जात होते. यानंतर, 16 जुलै 2023 पासून त्याची किंमत 80 रुपये प्रति किलोपर्यंत कमी करण्यात आली. 20 जुलैपासून दरात कपात करून 70 रुपये किलोने विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता 22 जुलैपासून दिल्लीत 70 रुपये दराने टोमॅटोची ऑनलाइन विक्री सुरू झाली आहे.


ONDC म्हणजे काय?


ONDC हे सध्या ई-कॉमर्स कंपन्यांना आव्हान देत आहे. डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क म्हणजेच ONDC सप्टेंबर 2022 मध्ये सुरू झाले. हे सरकारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. हे युजर्सना त्यांच्या घरी स्वस्त किमतीत अन्न आणि इतर आवश्यक वस्तू पुरवते. सध्या कोणतेही ONDC अॅप नाही. तुम्ही पेटीएम, मॅजिकपिन किंवा पिनकोड सारख्या अॅपला भेट देऊन ONDC शोधू शकता.


पेटीएम ONDC वर टोमॅटो कसे ऑर्डर करावे


- पेटीएम अॅप सुरू करा
-  सर्च बारमध्ये, "ONDC" टाइप करा आणि "ONDC Food" रिझल्टवर टॅप करा.
- ONDC फूड पेजवर, "omatoes from NCCF" वर टॅप करा.
- तुम्हाला किती टोमॅटो ऑर्डर करायचे आहेत ते निवडा.
- तुमचा पत्ता नमूद करा.
- तुमची पेमेंट पद्धत निवडा आणि तुमच्या ऑर्डरसाठी पैसे द्या.
- तुमची ऑर्डर दिली जाईल आणि तुम्हाला ऑर्डर नोदवली गेली असल्याचा एक मेसेज येईल.