इंदूर-पाटणा एक्स्प्रेस अपघात : मृतांचा आकडा 142 वर
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2016 07:56 AM (IST)
कानपूर : इंदूर-पाटणा एक्स्प्रेस दुर्घटनेतील मृतांचा आकडा 142 वर पोहोचला आहे. तर सुमारे 200 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इंदूरहून पाटण्याच्या दिशेने जाणाऱ्या इंदूर-पाटणा राजेंद्रनगर एक्स्प्रेसचे 14 डबे रविवारी पहाटे 3.10 वाजता रुळावरुन घसरले. कानपूरच्या पुखरायाजवळ झालेल्या अपघातात 5 एसी, 6 स्लीपर, 2 जनरल आणि 1 लगेजचा डब्बा रुळावरुन घसरला. S-2 या डब्ब्याचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. अजूनही काही जण ट्रेनमध्ये अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु असल्याची माहिती एनडीआरएफच्या पथकाने दिली आहे. कानपूरच्या पुखरायामध्ये रात्रभर मदत आणि बचावकार्य सुरु होतं. मात्र रात्रभरात कोणत्याही प्रवाशाला जिवंत बाहेर काढल्याचं वृत्त नाही.
पाटण्याला स्पेशल ट्रेन : पाटणा-इंदूर एक्स्प्रेसच्या अपघातानंतर काल रात्री उशिरा एक स्पेशल ट्रेन जखमी आणि इतर प्रवाशांना घेऊन पाटण्याला पोहोचली. सुमारे साडे तीनशे प्रवासी या स्पेशल ट्रेनने पाटणा जंक्शनवर पोहोचले. अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. "या दुर्घटनेनंतर मदतकार्य सुरु आहे. मेडिकल आणि इतर मदत पोहोचली आहे. अपघाताच्या तपासाचे आदेश दिले आहेत," असं ट्वीट सुरेश प्रभू यांनी केलं आहे.
रेल्वे रुळाला तडा गेल्या अपघात? रेल्वे रुळाला तडा गेल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. हिवाळ्यात नेहमीच अशाप्रकारच्या तक्रारी येतात. यामुळे ट्रॅकमन रुळावरुन ट्रेन जाण्याआधी त्याची तपासणी करतात. रेल्वे सुत्रांच्या माहितीनुसार, तपासणी चुका होऊ शकतात. मात्र कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टीच्या तपास अहवालानंतरच अपघाताचं नेमकं कारण समोर येईल. मृत आणि गंभीर जखमींना नुकसान भरपाई रेल्वे मंत्रालयाने अपघातातील पीडितांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 3.5 लाख रुपये, गंभीर जखमींना 50 हजार आणि किरकोळ जखमींना 20 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचं जाही केलं आहे. यासोबतच पंतप्रधान मदतनिधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
याशिवाय उत्तर प्रदेश सरकारनेही मदतीची घोषणा केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचं जाहीर केलं आहे. दुसरीकडे मध्यप्रदेशचे सीएम शिवराज सिंह चौहान यांनीही मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख आणि गंभीर जखमींना 50 हजार देण्याची घोषणा केली आहे.हेल्पलाईन नंबर