नवी दिल्ली : अच्छे दिनचा नारा देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले. या तीन वर्षात सरकारने अनेक कामं केली, अनेक आश्वासनं दिली, तर अनेक प्रश्नांवरुन सरकारला जनतेच्या रोषाचाही सामना करावा लागला. मोदी सरकारमधील मंत्र्यांनी तीन वर्षात कशा प्रकारे काम केलं, याची पडताळणी 'एबीपी न्यूज'च्या तज्ज्ञांनी केली आहे.


एबीपी न्यूजने मोदी सरकारमधील 24 मंत्र्यांना त्यांच्या कामकाजाच्या आधारे 50 तज्ञांच्या टीमने गुण दिले. या टीममध्ये देशभरातील नामांकित 50 पत्रकारांचा समावेश होता. मंत्र्यांना दहापैकी गुण देण्यात आले.

  1. नितीन गडकरी अव्वल


एबीपी न्यूजच्या तज्ञांच्या टीमने दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना सर्वाधिक 6.86 गुण दिले आहेत.

  1. पीयूष गोयल, ऊर्जामंत्री


एबीपी न्यूजच्या पडताळणीत ऊर्जामंत्री पीयूष गोयल दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना 6.66 गुण मिळाले आहेत.

  1. धर्मेंद्र प्रधान, पेट्रोलिअम मंत्री


मोदी सरकारमधील टॉप मंत्र्यांच्या यादीत धर्मेंद्र प्रधान तिसऱ्या स्थानावर आहेत. तज्ञांच्या टीमने त्यांना 6.40 गुण दिले आहेत.

  1. सुषमा स्वराज, परराष्ट्र मंत्री


परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. त्यांना 6.18 गुण मिळाले आहेत.

  1. अरुण जेटली, अर्थमंत्री


देशाची अर्थव्यवस्था ज्यांच्या हातात आहे, त्या अर्थमंत्री अरुण जेटली यांना 6.17 गुण देण्यात आले आहेत. मोदी सरकारच्या टॉप मंत्र्यांच्या यादीत ते पाचव्या स्थानावर आहेत. तज्ञांनी जेटलींच्या जीएसटीबाबतीत कामाचं कौतुक केलं आहे.