Parliament Session : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Session) निलंबन करण्यात आलेल्या 12 राज्यसभा खासदारांच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन करत निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी केंद्रावर आरोप करत सरकार प्रश्नांना घाबरते असा आरोप केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, ''प्रश्नांना घाबरते, सत्याला घाबरते, धैर्याला घाबरते… जे सरकार घाबरते, ते अन्याय करते.'' गेल्या चार दिवसांपासून 12 खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा गाजत असताना राहुल गांधी यांनी हे ट्विट केलं आहे. 






संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेत काँग्रेस, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेससह इतर विरोधी पक्षांमधील 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. यामध्ये फुलो देवी नेताम (काँग्रेस), छाया वर्मा (काँग्रेस), रिपुन बोरा (काँग्रेस), राजमणी पटेल (काँग्रेस), डोला सेन (काँग्रेस),शांता छेत्री (काँग्रेस), सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस), अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस) प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना), इलामाराम करीम (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), बिनॉय विश्वम (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) या खासदारांचा समावेश आहे.


संसद भवन परिसरात विरोधकांची निदर्शने
राज्यसभा खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात विरोधकांनी गुरुवारी ही संसद भवन परिसरात निदर्शने केली. विरोधकांनी माफी मागण्यास साफ नकार दिला आहे. गुरुवारी विरोधकांनी काळी पट्टी आणि काळं मास्क लावून आपला विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनीही विरोधी पक्षांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणूगोपाल यांनी म्हटलं की, निलंबन मागे घेईपर्यंत निदर्शने सुरुच राहणार आहेत. विरोधी पक्षांनी माफी मागण्यास साफ नकार देत खासदारांची चुकी काय? त्यांनी केवळ जनतेची भूमिका मांडली, असा प्रश्न विचारला आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनीही सरकारवर आरोप केला की, ''5 राज्यामध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार खासदारांना पाडण्यासाठी ज्यामुळे जनतेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होऊ नये यासाठी राजकारण करतं आहे.''


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha