Parliament Special Session Live Updates : संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान मंत्रिमंडळाची बैठक, मोदी कॅबिनेट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Parliament Special Session : आजपासून संसदेच्या पाच दिवसीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. 22 सप्टेंबरपर्यंत हे विशेष अधिवेशन सुरु राहणार आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 18 Sep 2023 04:18 PM
Parliament Special Session Live : उद्या सकाळी 11 वाजता खासदारांना सेंट्रल हॉलमध्ये जमण्याचा आवाहन

राज्यसभेने एक निवेदन जारी करत सर्व सदस्यांना मंगळवारी नवीन संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये जमण्याचं आवाहन केलं आहे.





Parliament Special Session Live : संसद सदस्यांचं फोटो सेशन

मंगळवारी, 19 सप्टेंबरला सकाळी 9.30 वाजता संसद भवनाचे सेंट्रल हॉल कोर्टयार्ड 1 आणि गेट 1 यांच्यामधील अंगणात राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांचा एकत्रित फोटो घेतला जाईल. 

Parliament Special Session Live Updates : संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान मंत्रिमंडळाची बैठक 

Modi Cabinet Meeting : संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान संध्याकाळी 6.30 वाजता मोदी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

Parliament Special Session Live : मल्लिकार्जुन खरगेंकडून राज्यसभेत पुन्हा मणिपूरचा मुद्दा उपस्थित

मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेत पुन्हा एकदा मणिपूरचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'गांधीजींनी जे स्वातंत्र्य मिळवले ते अहिंसेवर आधारित होते. या इमारतीत 75 वर्षात देशाचा चेहरामोहरा बदलला आहे. आता जोरदार विरोध झाला तर ईडी आणि सीबीआय त्यांच्या घरी पाठवले जाते. पंतप्रधान देशाच्या प्रत्येक भागाला भेट देतात पण ते मणिपूरला का जात नाहीत.

Parliament Special Session Live Updates : दिनेश शर्मा यांनी राज्यसभेत खासदार म्हणून शपथ घेतली

संसदेच्या विशेष अधिवेशनात भाजप नेते दिनेश शर्मा यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. दिनेश शर्मा यांची उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आलं.

PM Modi Speech Live in Lok Sabha : संसदेची जुनी वास्तू सोडणं भावूक क्षण : पंतप्रधान मोदी

Parliament Special Session Live Updates : संसदेची जुनी वास्तू सोडणं भावूक क्षण : पंतप्रधान मोदी

Parliament Special Session Live Updates : जी-20 चं यश हे संपूर्ण देशाचं यश, पंतप्रधान मोदींचं लोकसभेत संबोधन

जी-20 परिषद यशस्वी होणं, हे संपूर्ण देशाचं यश आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत संबोधन करताना म्हटलं.





Parliament Special Session Live : संसदेची जुनी वास्तू सोडणं भावूक क्षण : पंतप्रधान मोदी

Parliament Special Session Live : संसदेची जुनी वास्तू सोडणं भावूक क्षण, जुने संसद भवन अतिशय प्रेरणादायी : पंतप्रधान मोदी

Parliament Special Session Live Updates : नव्या संसदेच्या इमारतीसाठी देशातील नागरिकांच्या मेहनतीचं योगदान : मोदी

Parliament Special Session Live : पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, नवीन संसद भवनात जाण्यापूर्वी देशाच्या संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासाचे स्मरण करूया. या ऐतिहासिक वास्तूला आपण सर्वजण निरोप देत आहोत. यामध्ये देशवासीयांचा घाम गाळला गेला आहे. जुने संसद भवन येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल.

Parliament Special Session Live : संसदेच्या 5 दिवसांच्या विशेष अधिवेशनात मांडली जाणारी विधेयकं

संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनात विधेयके मांडली जाणार आहेत.


अधिवक्ता (दुरुस्ती) विधेयक (3 ऑगस्ट रोजी राज्यसभेत मंजूर)


नियतकालिक प्रेस आणि नोंदणी विधेयक (3 ऑगस्ट रोजी राज्यसभेने मंजूर केले)


पोस्ट ऑफिस विधेयक (10 ऑगस्ट रोजी राज्यसभेत सादर करण्यात आले)


CEC आणि इतर EC विधेयक 2023 (10 ऑगस्ट रोजी राज्यसभेत सादर केले गेले)

Parliament Special Session Live : मागील 75 वर्षांत 600 हून अधिक महिला खासदारांचं योगदान

Parliament Special Session Live : मागील 75 वर्षांत 600 हून अधिक महिला खासदारांचं योगदान, जुनी संसदे अनेक ऐतिहासिक घटनाचा साक्षीदार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

Parliament Special Session Live Updates : आजपासून जुन्या संसदेत कामकाजाचा शेवटचा दिवस

Parliament Special Session Live Updates : आजपासून जुन्या संसदेत कामकाजाचा शेवटचा दिवस, उद्यापासून संसदेच्या नव्या वास्तूमध्ये कामकाज सुरु होईल.

Parliament Special Session Live Updates : आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन

Parliament Special Session Live Updates : आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन, 22 सप्टेंबरपर्यंत चालणार अधिवेशन

PM Narendra Modi Speech LIVE : जुन्या संसद भवनाचं संग्रहालय करणार

PM Narendra Modi Speech LIVE : जुन्या संसद भवनाचं संग्रहालय करणार, जनतेला इतिहास पाहता येणार : पंतप्रधान मोदी

PM Modi:  मोदी आणि वरिष्ठ मंत्र्यांची संसद भवनात बैठक,  विशेष अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा

PM Modi:  मोदी आणि वरिष्ठ मंत्र्यांची संसद भवनात बैठक सुरू आहे.  विशेष अधिवेशनाच्या रणनीतीवर मोदींनी बैठक बोलावली आहे. अधिवेशन सुरळीत पार पाडण्यावर मोदी सरकारचा भर आहे.

PM Narendra Modi Speech LIVE : 7500 हून अधिक खासदारांचं संसदेत योगदान

PM Narendra Modi Speech LIVE : 7500 हून अधिक खासदारांचं संसदेत योगदान : पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi Speech LIVE : 1947 पासून हे सदन अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार : पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi Speech LIVE : जुनं संसद भवन 1947 पासून अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार : पंतप्रधान मोदी

PM Modi Live : आपण संसदेच्या ऐतिहासिक वास्तूला निरोप देत आहोत : पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi Speech LIVE : लोकसभेत पंतप्रधान मोदी यांनी भाषण करताना म्हटलं ती, "आपण सर्वजण या (संसदेच्या) ऐतिहासिक वास्तूला निरोप देत आहोत. स्वातंत्र्यापूर्वी हे सभागृह इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे ठिकाण होते. स्वातंत्र्यानंतर या इमारतीला संसद भवनाची ओळख मिळाली."





Parliament Special Session Live Updates : पंतप्रधान मोंदींच्या भाषणानं कामकाजाला सुरुवात

आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन! पंतप्रधान मोंदींच्या भाषणानं कामकाजाला सुरुवात

पार्श्वभूमी

Parliament Special Session : आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला (Parliament Special Session) सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. आज जुन्या संसदेत शेवटचं अधिवेशन पार पडणार आहे. उद्यापासून संसदेच्या नव्या वास्तूमध्ये कामकाम सुरु होईल. 


आज जुन्या संसद भवनामध्ये कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. जुनी संसद भवन 75 वर्षांपासून विविध ऐतिहासिक निर्णय आणि घटनांचा साक्षीदार आहे. या संसदेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जुन्या संसद भवनामध्ये आज शेवटचं कामकाज पार पडणार असून उद्या नवीन संसद भवनाच्या इमारतीचा श्रीगणेशा करण्यात येईल. त्याआधी आज जुन्या संसद भवनातील अनुभव, आठवणी आणि आतापर्यंतचा प्रवास यासंदर्भात आज चर्चा करण्यात येईल.


सरकारच्या अजेंड्यानुसार या अधिवेशनात एकूण आठ विधेयकं मांडली जाणार आहेत. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंबंधीचे विधेयक प्रमुख आहे. महिलांना आरक्षण देणारं विधेयक लोकसभेतही मांडलं जाऊ शकतं. समान नागरी कायदा आणि देशाचं नाव बदलण्याबाबतही चर्चा आहे. दरम्यान, आजची बैठक जुन्या इमारतीत होणार आहे. सेंट्रल हॉलमधील समारंभानंतर विद्यमान संसद नवीन इमारतीत हस्तांतरित केली जाईल. 


अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय होणार


संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक पार पडली. जुन्या संसद भवनाच्या आवारात ही बैठक झाली. वरिष्ठ मंत्र्यांसोबतच्या बैठकीत अधिवेशनातील कामकाजासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं होतं की, 'हे अधिवेशन छोटं असलं तरी महत्त्वाचं आहे, या अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय होणार आहेत.'


संसदीय कार्यमंत्री प्रह्लाद जोशी यांनी सांगितलं की, पहिल्या दिवशी जुन्या संसद भवनात अधिवेशन होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 सप्टेंबर रोजी जुन्या संसदेत फोटो सेशन होईल, त्यानंतर सकाळी 11 वाजता सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम होईल. त्यानंतर आम्ही नव्या संसदेत प्रवेश करू. नव्या संसदेत 19 सप्टेंबरपासून संसदेचं अधिवेशन सुरू होणार असून 20 सप्टेंबरपासून नव्या संसदेत नियमित सरकारी कामकाज होणार आहे.


संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनात चार विधेयके मांडण्यात येणार आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा म्हणून चार विधेयकांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीशी संबंधित विधेयक, अधिवक्ता दुरुस्ती विधेयक, पोस्ट ऑफिस बिल, प्रेस आणि नियतकालिकांच्या नोंदणी विधेयकाचा समावेश आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.