Parliament Session 2024 : 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून (24 जून) सुरू झाले आहे. प्रथम सभागृहात राष्ट्रगीत झाल्यानंतर मागील सभागृहातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पहिली शपथ पंतप्रधान मोदींनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. मोदींनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकसभा खासदारांनी शपथ घेतली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव शपथेसाठी पुकारले गेले तेव्हा विरोधकांनी NEET-NEET, शेम शेम असे म्हणण्यास सुरुवात केली. पेपर हेराफेरीप्रकरणी विरोधकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.






मोदी आणि राहुल गांधींच्या राजकीय संघर्षाची पहिल्याच दिवशी झलक!


दरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यानंतर पंतप्रधान मोदींनी सभागृहात बसलेल्या सर्व खासदारांना हात जोडून अभिवादन केले. यावेळी राहुल गांधीही संविधानाची प्रत घेऊन सभागृहात बसले होते. त्यांनी हसत आणि हात जोडून पंतप्रधान मोदींच्या अभिवादनाला उत्तर दिले.





याशिवाय सभागृहात उपस्थित असलेल्या इतर खासदारांनीही पंतप्रधान मोदींचे हात जोडून अभिवादन स्वीकारले.


दुसरीकडे, 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. प्रोटेम स्पीकर आणि नीट पेपर लीक प्रकरणी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. या सगळ्यात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष 'इंडिया' आघाडीच्या खासदारांनी संविधानाची प्रत घेऊन संसदेबाहेर मोर्चा काढला. यानंतर सर्व विरोधी खासदार संविधानाची प्रत घेऊन सभागृहात पोहोचले.


तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भत्रीहरी महताब यांना प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ दिली. यानंतर प्रोटेम स्पीकरांनी सर्व खासदारांना शपथ देण्यास सुरुवात केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 280 खासदार शपथ घेणार आहेत.


अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेत पोहोचलेले पीएम मोदी म्हणाले की, देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक आहे. सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. संविधानाच्या मर्यादा पाळून देशाला पुढे न्यायचे आहे. देशाला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे. नवीन खासदार आज आणि उद्या संसदेत शपथ घेतील. तत्पूर्वी, भाजप खासदार भर्तुहरी महताब यांना सोमवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोटेम स्पीकरची शपथ दिली. यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू राष्ट्रपती भवनात उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या