Derek O Brien Suspended : टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन (Derek O Brien) यांना राज्यसभेतून (Rajyasabha) निलंबित करण्यात आले आहे. डेरेक ओब्रायन यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याची कारवाई सभापती जगदीप धनखड यांनी केली आहे. सभागृहात असभ्य वर्तन केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान डेरेक यांच्याआधी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना देखील निलंबित करण्यात आलं आहे. 


राज्यसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरुन गदारोळ सुरु होता. यावेळी टीमएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी उभं राहून या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली होती. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना खडसावले आणि त्यांना जागेवर बसण्याची सूचना केली. पण तराही ओब्रायन हे गप्प बसले नाहीत त्यामुळे सभापतींनी त्यांना कठोर शब्दात शांत राहण्यास सांगितले. 


पीयुष गोयल यांनी मांडला निलंबित करण्याचा प्रस्ताव 


सभापतींना डेरेक ओब्रायन यांचे नाव घेतल्यानंतर पियुष गोयल यांनी त्यांच्या विरोधात निलंबित करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडला. यावेळी बोलतांना पियुष गोयल यांनी म्हटलं की, 'सभागृहातील कारवाईमध्ये सातत्याने व्यत्यय आणल्याबद्दल, सभापतींचं म्हणणं न ऐकल्याबद्दल आणि सभागृहात सतत गोंधळ निर्माण केल्याबद्दल डेरेक ओब्रायन यांच्या विरोधात उर्वरित अधिवेशनाच्या कालावधीसाठी त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव आम्ही मांडत आहोत.' तसेच सभापतींनी देखील हा प्रस्ताव मंजूर केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


त्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी डेरेक ओब्रायम यांना सभागृहातून बाहेर जाण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. सभापती जगदीप धनखड यांनी त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही स्थगित केलं. 


याआधी संजय सिंह यांच्यावर केली कारवाई


डेरेक हे पावसाळी अधिवेशनातील पहिले सदस्य नाहीत ज्यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनाकरिता निलंबित करण्यात आले आहे. याआधी आप पक्षाचे खासदार संजय सिंह यांना देखील राज्यसभेतून संपूर्ण पावसाळी अधिवेशनाकरिता निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे विरोधीपक्षातील आतापर्यंत दोन खासदारांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनाकरिता निलंबित करण्यात आले आहे. 


दरम्यान लोकसभेत विरोधकांकडून सरकारविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वासाच्या प्रस्तावावर देखील चर्चा सुरु करण्यात आली आहे. विरोधकांकडून गौरव गोगई यांनी लोकसभेत अनेक सवाल उपस्थित केले. तर सरकारकडूनही विरोधकांच्या सवालांना चोख उत्तर देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 10 ऑगस्ट रोजी या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. 


हेही वाचा :