Parliament Monsoon Session Live: अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू

Parliament Monsoon Session Live: मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे.

abp majha web team Last Updated: 10 Aug 2023 07:31 PM
Narendra Modi Speech: अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन, आवाजी मतदान करुन सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव फेटाळला. 

Narendra Modi Speech: अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन, आवाजी मतदान करुन सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव फेटाळला. 

Narendra Modi Speech: जनतेला संभ्रमात टाकण्याचा विरोधकांचा प्रयत्न - मोदी

Narendra Modi Speech: काँग्रेसने भारतमातेचे तुकडे केले असल्याचं मोदी म्हणाले. जनतेला संभ्रमात टाकण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचंही मोदी म्हणाले.

Narendra Modi Speech: दीड तासांनंतर मोदींचं मणिपूरवर भाषण सुरू

Narendra Modi Speech: मणिपूरवासियांनो, देश तुमच्यासोबत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. महिलांवरील अन्याय सहन केले जाणार नाही, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असं मोदी म्हणाले. 

Narendra Modi Speech: मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग

Narendra Modi Speech: मणिपूरवर भाष्य न केल्याने विरोधकांनी सभात्याग केला आहे. त्यानंतर मोदी म्हणाले, विरोधकांनाच मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची इच्छा नाही. विरोधकांच्या सभात्यागानंतर मोदींनी मणिपूरवर बोलण्यास सुरुवात केली.

Narendra Modi Speech: काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे जनतेचं नुकसान - मोदी

Narendra Modi Speech: काँग्रेसच्या घराणेशाहीने अनेकांचे अधिकार हिरावल्याचं मोदींनी म्हटलं. आंबेडकरांना काँग्रेसने दोन वेळा पराभूत केल्याचं मोदी म्हणाले. तर काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे जनतेचं नुकसान होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Narendra Modi Speech: 'घमंडिया' बंधन म्हणजे घराणेशाहीचं उदाहरण - मोदी

Narendra Modi Speech: विरोधकांच्या आघाडीत एकी राहणार नाही, असं मोदी म्हणाले. तर विरोधकांचं घमंडिया बंधन म्हणजे घराणेशाहीचं उदाहरण असल्याचंही मोदी म्हणाले. काँग्रेसला घराणेशाही आवडते. मोठ्या पदांवर त्यांच्याच घरातले लोक असल्याचंही मोदींनी म्हटलं.

Narendra Modi Speech: हे इंडिया गठबंधन नाही, तर 'घमंडिया' गठबंधन - मोदी

Narendra Modi Speech: विरोधकांच्या आघाडीत सर्वांना पंतप्रधान व्हायचंय, असं मोदी म्हणाले. तर विरोधकांचं हे इंडिया गठबंधन नसून ते घमंडिया गठबंधन आहे, असंही मोदी म्हणाले.

Narendra Modi Speech: काँग्रेसनं मतांसाठी गांधी नावही चोरलं - मोदी

Narendra Modi Speech:  काँग्रेसकडे स्वत:चं असं काहीच नाही, काँग्रेसनं मतांसाठी गांधी नावही चोरल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Narendra Modi Speech: विरोधकांच्या आघाडीला NDAचा आधार घ्यावा लागेल - मोदी

Narendra Modi Speech: देशाचं नाव वापरुन जनतेचा विश्वास मिळेल, असं विरोधकांना वाटलं. नाव बदलून सत्ता येईल, असं विरोधकांना वाटतं. पण विरोधकांच्या आघाडीला NDAचा आधार घ्यावा लागेल, असं म्हणत मोदींनी विरोधकांच्या आघाडीवर टीका केली आहे.

Narendra Modi Speech: विरोधकांनी इंडियाचे तुकडे केले - मोदी

Narendra Modi Speech: विरोधकांनी I.N.D.I.A.चे तुकडे केले असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीका केली आहे.

Narendra Modi Speech: भारतीय जनतेचा काँग्रेसवर अविश्वास - मोदी

Narendra Modi Speech: तामिळनाडू, पश्चिम बंगालच्या जनतेचा काँग्रेसवर विश्वास नसल्याचं मोदींनी म्हटलं. ओडिसाच्या नागरिकांचाही काँग्रेसवर अविश्वास असल्याचं मोदी म्हणाले.

Narendra Modi Speech: भारताला बदनाम करायला विरोधकांना आवडतं - मोदी

Narendra Modi Speech: भारताच्या विरोधातील सर्व गोष्टींवर विरोधकांचा विश्वास असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताला बदनाम करायला विरोधकांना आवडत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

Narendra Modi Speech: विरोधकांचं पाकिस्तानवर जास्त प्रेम - पंतप्रधान मोदी

Narendra Modi Speech: विरोधकांना भारतीय सेनेवर विश्वास नव्हता, पाकिस्तान जे बोलेल त्यावर विरोधक विश्वास ठेवत असल्याचं मोदी म्हणाले. विरोधकांचं पाकिस्तानवर जास्त प्रेम असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Narendra Modi Speech: काँग्रेसने देशात गरिबी वाढवली - पंतप्रधान मोदी

Narendra Modi Speech: काँग्रेसकडे नीती, नियत, दूरदृष्टी नसल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेसने देशात गरिबी वाढवली आणि त्यामुळे देश कंगाल झाल्याचंही मोदींनी म्हटलं आहे.

Narendra Modi Speech: ज्यांचे स्वत:चे हिशोब बिघडले, ते आमच्याकडे हिशोब मागतायत - मोदी

Narendra Modi Speech: इतके वर्ष सत्तेत राहूनही काँग्रेस अनुभवशून्य असल्याचं मोदींनी म्हटलं. तर ज्यांचे स्वत:चे हिशोब बिघडले आहेत, ते आमच्याकडे हिशोब मागतायत, असं म्हणत मोदींनी टोलाही लगावला.

Narendra Modi Speech: विरोधक ज्या कंपन्यांवर टीका करतात त्यांचं भाग्य उजळतं - मोदी

Narendra Modi Speech: LIC कंपनीवर विरोधकांनी टीका केली होती, पण आज LIC कंपनी उच्चांकी यश गाठत असल्याचं मोदी म्हणाले. विरोधकांनी लोकशाहीवर टीका केल्याने आता लोकशाही देखील उजळेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Narendra Modi Speech: जगभरात भारताचं नाव उंचावलं - पंतप्रधान मोदी

Narendra Modi Speech: जगाचा भारतावरचा विश्वास वाढत असल्याचं मोदी म्हणाले. तर जगभरात भारताचं नाव उंचावलं असून देशात परदेशी गुंतवणूक देखील वाढत असल्याचं मोदी म्हणाले. भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वासही मोदींनी दर्शवला.

Narendra Modi Speech: फिल्डींग विरोधकांची, बॅटींग सत्ताधाऱ्यांची - पंतप्रधान मोदी

Narendra Modi Speech: विरोधक तयारी करुन येत नाहीत का? असा प्रश्न नरेंद्र मोदींनी विचारला आहे, पाच वर्ष देऊनही विरोधकांनी तयारी केली नसल्याचं मोदींनी म्हटलंय. तर फिल्डींग विरोधकांची असली तरी बॅटींग सत्ताधारी करत असल्याचा टोला देखील मोदींनी लगावला आहे.

Narendra Modi Speech: विरोधकांना गरिबांच्या भुकेची चिंता नाही, त्यांना फक्त सत्तेची भूक - मोदी

Narendra Modi Speech: विरोधकांसाठी देशापेक्षा पक्ष महत्त्वाचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. विरोधकांना गरिबांच्या भुकेची चिंता नाही, तर त्यांना फक्त सत्तेची भूक असल्याचंही मोदी म्हणाले आहेत.

Narendra Modi Speech: 2024 मध्येही भाजप सत्तेवर येईल - पंतप्रधान मोदी

Narendra Modi Speech: 2024 मध्येही भाजप सत्तेवर येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सत्तेची भूक विरोधकांना आहे आणि त्यामुळेच त्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

Narendra Modi Speech: जनतेनेही विरोधकांवर विश्वास दाखवला नाही - पंतप्रधान मोदी

Narendra Modi Speech: जनतेनेही विरोधकांवर विश्वास दाखवला नाही - पंतप्रधान मोदी


विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ - पंतप्रधान मोदी


ही आमची नाही, विरोधकांची बहुमत चाचणी - पंतप्रधान मोदी

पार्श्वभूमी

 Parliament Monsoon Session Live: मणिपूरच्या (Manipur Violence) मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणला आहे. त्यावर आज दुपारी 12 वाजल्यापासून चर्चा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चर्चेची सुरुवात राहुल गांधींपासून (Rahul Gandhi) होण्याची शक्यता आहे. राहुल यांना सोमवारीच खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. त्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांनी त्यांचं संसद भवनात जल्लोषात स्वागत केलं. दरम्यान, याच मुद्द्यावर पंतप्रधान मोदी गुरुवारी उत्तर देणार आहेत. दरम्यान या मुद्द्यावर राहुल गांधी काय बोलणार याकडे सध्या लक्ष लागलंय. तसंच आज राहुल गांधी कोणावर निशाणा साधणार हेही पाहणे महत्त्वाचं असणार आहे.


 मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव असणार आहे.एनडीएकडे 332 चं संख्याबळ आहे. सरकारला धोका तर नाहीय, पण तरी सभागृहातल्या चर्चेला मात्र सरकारला अखेर सामोरं जावं लागणार आहे. मणिपूरच्या मुद्दयावर पंतप्रधान मोदी बोलायला तयार नसल्यानं या अविश्वास प्रस्तावाची रणनीती काँग्रेस आणि विरोधकांकडून आखली गेली आहे. मणिपूरच्या मुद्दयावर अनेक दिवसांपासून संसदेत गदारोळ सुरु होता.  विरोधक पंतप्रधानांच्याच उत्तरासाठी आग्रही होते. अविश्वास प्रस्तावावर उत्तर पंतप्रधानांनाच द्यावं लागतं, त्यामुळे यानिमित्तानं पंतप्रधानांनाच उत्तर देण्यास भाग पाडण्याची रणनीती आखली गेली आहे.


मोदी सरकारविरोधात 2014 नंतर आलेला हा दुसरा अविश्वास प्रस्ताव आहे. याआधी 2018 मध्ये टीडीपी सरकारनं अविश्वास प्रस्ताव आणला होता. 


कसा सादर होणार अविश्वास प्रस्ताव?



  • अविश्वास प्रस्तावासाठी किमान 50 खासदारांच्या सह्यांचं अनुमोदन असेल तर कुणीही सदस्य अशी नोटीस दाखल करु शकतो 

  •  सकाळी दहा वाजण्याच्या आधी अशी नोटीस दाखल झाली तर त्याच दिवशी सभागृहाच्या पटलावर ती स्वीकारावी लागते

  • त्यानंतर लोकसभा अध्यक्ष त्या प्रस्तावावर चर्चेसाठी वेळ आणि तारीख निश्चित करतात

  • अविश्वास प्रस्तावार मतदान होत असताना जर विरोधकांचं बहुमत दिसलं तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो

  • स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत 27 वेळा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला गेलाय, बहुतांश वेळा तो बहुमतानं फेटाळलं गेलाय

  • अपवाद 1979 मध्ये मोरारजी देसाई आणि 1999 मध्ये वाजपेयींच्या सरकारचा भाजपकडे स्वत:चे 303, एनडीएकडे 332 खासदारांचं पाठबळ आहे.

  • त्यामुळे सरकारला धोका नाही हे तर स्पष्ट आहे. फक्त या निमित्तानं सभागृहात पंतप्रधानांना उत्तरास भाग पाडण्याची नीती यशस्वी होत आहे. मागच्या वेळी 2018 मध्ये मोदी सरकारला 330 खासदारांनी पाठिंबा देत अविश्वास प्रस्ताव हाणून पाडला होता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.