पम्पोर (जम्मू काश्मीर): जम्मू काश्मीरमधील पम्पोरमध्ये मागील 24 तासांपासून दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरु आहे. दहशतवादी ईडीआय नावच्या शासकीय इमारती लपून बसले असून तिथून ते वारंवार गोळीबार करत आहे.


काल रात्री १२ वाजता आणि २ वाजता दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला.

श्रीनगरपासून 15 किमी दूर पम्पोरमध्ये EDI म्हणजे Enterprenurship Development Institute या शासकीय इमारतीत दहशतवादी दडून बसले आहेत. इमारतीतून धुराचे आणि आगीचे लोट सुरु आहेत. या आगीत इमारतीचा पहिला मजला जळून खाक झाला आहे.

                                                                            (AP Photo/Mukhtar Khan)

काल सकाळपासून इमारतीतून दहशतवाद्यांचा गोळीबार

काल सकाळी 6.30च्या दरम्यान, दहशतवादी इमारतीत आश्रयास गेले. त्यानंतर त्यांनी तिथून गोळीबार सुरु केला. या गोळीबारामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत. कालपासून वारंवार इमारतीमधून गोळीबार होत आहे.

झेलम नदीच्या मार्गे दहशतवादी घुसल्याची शंका

पम्पोरमध्ये मागील २४ तासापासून चकमक सुरु आहे. इमारतीला लागून शालिन गावामधून दहशतवादी इमारतीत घुसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर झेलम नदीच्या मार्गाने दहशतवादी घुसल्याची शंका आहे.

ईडीआयच्या हॉस्टेलमधील इमारतीत तब्बल 60 खोल्या आहेत.

जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा सुदैवानं तिथं एकही विद्यार्थी नव्हता. त्यावेळी तिथे फक्त एक कूक होता. इमारतीला आग लागल्यानंतर त्यानं अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावलं. जेव्हा  जवान आग विझविण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

फेब्रुवारीमध्ये देखील इथं दहशतवाद्यांनी केला होता हल्ला

फेब्रुवारी महिन्यात अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला केला होता. ज्यामध्ये दोन जवान शहीद झाले होते. त्यानंतर अतिरेकी ईडीआयच्या इमारतीत घुसण्यात यशस्वी झाले होते. या गोळीबारात एका नागरिकांचा देखील मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या

पम्पोरमध्ये शासकीय इमारतीवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान जखमी