सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या हालचाली
एबीपी माझा वेब टीम | 30 Sep 2016 07:57 AM (IST)
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवरचा तणाव तासागणिक वाढत आहे. सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्याचं दिसत आहे. काही भागांमध्ये पाकिस्तानी रेंजर्स दिसल्याने सीमेवरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
आरएसपुरा, अरनिया या दोन सीमांवर पाकिस्तानची अॅक्शन टीम आणि लष्कराच्या हालचाली दिसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झालेल्या उरीजवळच्या सीमेवरही पाकिस्तानी सैन्याची तुकडी दिसल्याची माहिती मिळत आहे.
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान उत्तर देणार हे अपेक्षित होतं. त्यानंतर सीमेजवळ पाकिस्तान सैन्याचा स्पेशल अॅक्शन ग्रुप दिसला होता. पाकिस्तानला प्रतिकार देण्याची तयारी भारताने केली होती. त्यामुळे भारतीय सैन्यानेही सीमेवरची सुरक्षा चोख ठेवली आहे.
27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 7 तळांना उद्ध्वस्त झाली. यामध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. संबंधित बातम्या