नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर तो देश अनागोंदीच्या दिशेने चालला असल्याचं चित्र आहे. पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरला ताब्यात (Asim Munir Arrested) घेण्यात आलं असून त्याची उचलबांगडी केली जाणार आहे. असीम मुनीर याच्या हेकेखोरीमुळे पाकिस्तानवर युद्धाची वेळ आली असल्याचं मत तिथल्या नागरिकांचे आणि सत्ताधाऱ्यांचं झाल्याची माहिती आहे. त्याचमुळे असीम मुनीर याच्यावर देशद्रोहाचा खटलाही चालवला जाणार असल्याची माहिती आहे. पाकिस्ताच्या लष्करप्रमुखपदी आता शमशाद मिर्झा यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे.
असीम मुनीर हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची भावना भारताची आहे. त्याच्या चिथावणीनंतरच दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांना चिथवायचं आणि नंतर भारताने प्रतिक्रिया दिल्यावर भारतावर हल्ला करायचा असा असीम मुनीर याचा डाव होता.
असीम मुनीरच्या खुमखुमीमुळे युद्ध
पाकिस्तानी जनतेची आणि राज्यकर्त्यांची इच्छा नसतानाही असीम मुनीरच्या खुमखुमीमुळे पाकिस्तानवर युद्धाची वेळ आली असल्याची समज सर्वत्र आहे. आधीच पाकिस्तानची परिस्थिती ही डबघाईला आली होती. त्यात भारतासोबत कुरापत काढून असीम मुनीरने ही परिस्थिती आणल्याची भावना तिथल्या लोकांची आहे. सध्य स्थितीमध्ये पाकिस्तानला युद्ध परवडणार नाही. अशाही स्थितीत असीम मुनीरने पाकिस्तानला युद्धाच्या खाईत लोटलं.
चीनवर अवलंबण्याचा निर्णय चुकला
भारतासोबत युद्ध झाल्यास चीन आपल्या मदतीला येईल असा समज असलेल्या असीम मुनीरचा डाव पुरता फसला आहे. अमेरिका आणि रशियाने भारताला उघड पाठिंबा दिला. त्याचवेळी चीनने पाकिस्तानला पाठिंबा जरी दिला असला तरी युद्धाच्यावेळी मात्र त्याच्या मदतीला आल्याचं दिसलं नाही.
नौदलाचा कराचीवर हल्लाबोल
एकीकडे भारतीय लष्कर आणि वायूदल कारवाई करत असताना दुसरीकडे नौदलानेही कराची बंदरावर जोरदार हल्लाबोल केला. या तीनही दलांच्या हल्ल्यासमोर पाकिस्तानच्या लष्कराचा निभाव लागला नाही. त्याचमुळे असीम मुनीरचा फुकाचा आत्मविश्वास त्याला नडल्याचं दिसून आलंय.