नवी दिल्ली : भारतानं पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. भारतानं पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांना पाडलं आहे. भारतानं पाकिस्तानचं एफ-16 पाडलं आहे. भारतानं राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानचं एफ-16 पाडलं आहे. याशिवाय पाकिस्तानच्या JF-17 या दोन लढाऊ विमानांना देखील भारतानं पाडलं आहे. भारतानं आमची चिनी बनावटीची दोन जेएफ-17 पाडल्याची कबुली पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारतानं पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर द्वारे मोठा दणका दिला आहे. पाकिस्तानची दोन विमानं भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून पाडण्यात आली आहे. पाकिस्तनाच्या अधिकाऱ्यांकडूनचं याची कबुली देण्यात आली आहे. भारतानं एअर डिफेन्स सिस्टीमकडून विविध ठिकाणी करण्यात आलेले ड्रोन अटॅक देखील परतवून लावण्यात आले आहेत.
भारताची एअर डिफेन्स सिस्टीम एस-400 नं पाकिस्तानचं लढाऊ विमान जेएफ-16 पाडण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या एका लष्करी अधिकाऱ्यानं पाकिस्तानची दोन विमानं पाडली गेल्याची कबुली दिली आहे. भारतानं पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या जेफ-17 दोन विमानांना पाडण्यात भारताला यश आलं आहे. भारतानं राजस्थानमध्ये एफ-16 विमान पाडलं आहे. पाकिस्तानची जी विमान भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करतील ती पाडली जातील.
भारतानं पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल, मोर्टार अटॅक, हवाई अटॅक परतवून लावला आहे. भारतीय सैन्याकडून पाकचे हल्ले परतवून लावण्यात आले आहेत. भारताकडून देखील पाकिस्तानच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असल्याची माहिती आहे.
भारतानं पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिल्यानं पाकचं मोठं नुकसान झालं आहे. भारतानं पाकिस्तानची जेएफ-17 ही विमानं काल पाडली होती. भारताकडून पाकिस्तानला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे.
भारतानं सतर्कतेचा भाग म्हणून विविध ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आले आहेत. श्रीनगर विमानतळावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतानं जम्मू,श्रीनगर, पठाणकोट, जैसलमेर या ठिकाणी पाकचे हल्ल्याचे प्रयत्न परतवून लावले आहे.
दरम्यान, पाकिस्तान करण्यात आलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. भारतानं चंदीगडमध्ये देखील ब्लॅक आऊट जारी केला आहे. श्रीनगरच्या काही भागांमध्ये सायरन वाजवण्यात येत असून एअर डिफेन्स सिस्टीम सक्रीय करण्यात आली आहे.
दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस आणि तिन्ही संरक्षण दलाच्या प्रमुखांसोबत बैठक सुरु केली आहे. राजनाथ सिंह यांनी तिन्ही सेनाप्रमुखांसोबत चर्चा सुर केली आहे. भारतानं प्रत्यु्त्तरादाखल कारवाई सुरु केली असून लाहोरमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.