Pakistan: आम्हाला आतापर्यंत चुकीचा इतिहास सांगितला गेला, पाकिस्तानने आतापर्यंत भारताविरोधात एकही युद्ध जिंकलं नाही.... हे शब्द आहे पाकिस्तानमधील एका नागरिकाचे. पाकिस्तानने आता भारताशी तुलना करणे बंद केलं पाहिजे, त्याने आपल्या अंतर्गत समस्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असंही तो पाकिस्तानी नागरिक म्हणतोय. जम्मू काश्मीर हा पाकिस्तानमधील राजकारण्यांनी तयार केलेला विषय आहे असंही तो नागरिक म्हणताना दिसतोय. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


एक पाकिस्तानी सेल्समन रिअल एंटरटेनमेंट टीव्ही नावाच्या यूट्यूब चॅनेलवर असं म्हणताना दिसत आहे की, दुर्दैवाने आम्हाला इतिहासाबद्दल चुकीचे सांगितले गेले आहे. आजपर्यंत आपण भारताशी एकही युद्ध जिंकलेले नाही. भारताच्या संरक्षणमंत्र्यांचे म्हणणे योग्य आहे, पाकिस्तानने सध्या स्वतःच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. देशातील वाढती बेरोजगारी आणि महागाई याकडे लक्ष दिले पाहिजे.


Pakistani People Reaction On India  : पाकिस्तानची वाईट प्रतिमा


पाकिस्तानने देशातील शिक्षण क्षेत्रात बदल करण्याची गरज आहे, असं तो नागरिक म्हणताना दिसत आहे. आपल्या भावी पिढ्यांना इतिहासाची योग्य माहिती देणे गरजेचे आहे. भारत-पाकिस्तान सोडून इतरही मुद्दे आहेत, जे खूप महत्त्वाचे आहेत. इतकंच नाही तर व्हिडीओतील व्यक्ती म्हणते की आज पाकिस्तानची प्रतिमा जगात खूप खराब झाली आहे. यामागे काय कारण आहे? आपण पाकिस्तानची चांगली प्रतिमा का निर्माण करू शकलो नाही?


आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या पाकिस्तानची अवस्था आणखीनच बिकट होत चालली असल्याचं चित्र आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे आंतराष्ट्रीय मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत, ते आपल्या मित्र देशांना मदतीची विनंती करत आहेत. एकंदरीत पाकिस्तान आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. पाकिस्तानातील लोक त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत लोकांमध्ये तिथल्या सरकारबद्दल नाराजी आहे. त्याचबरोबर भारताशी तुलना करणे निरुपयोगी असल्याचा सल्ला ते सरकारला देत आहेत. पाकिस्तानने आपल्या अंतर्गत समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे असा सल्ला तिथल्या नागरिकांनी सरकारला दिला आहे.


Pakistani People Reaction On Jammu Kashmir  : भारतामुळे पाकिस्तानची स्थिती सुधारली असती


भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांबद्दल तो सेल्समन म्हणतो की, भारताची बाजारपेठ खूप मोठी आहे. तिथे पाकिस्तानच्या एक-दोन गोष्टींनाही संधी मिळाली तरीही पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारेल. पाकिस्तानमधील अर्धी बेरोजगारी अशीच दूर होईल.


ही बातमी वाचा: