श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याकडून आज सकाळपासून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु आलं. जम्मू काश्मीरमधील पूंछ भागातील केरनी आणि दिग्वार परिसरात पाक सैन्यानं बेछूट गोळीबार केला. त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर बारामुल्ला सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
आज दुपारपासून बारामुल्ला सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. त्यांच्याकडून दोन शस्त्रं हास्तगत करण्यात आले आहेत.
बारामुल्ला डिव्हीजनचे जनरल आर.पी.कलिता यांनी सांगितलं की, जवळपास 60 ते 70 दहशतवादी पाकिस्तान सीमेतून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते.
दुसरीकडे, पूंछ सेक्टरमधील केरन परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून बेच्छूट गोळीबार करण्यात आला. यात लहान, स्वयंचलित शस्त्रांद्वारे पाक सैन्याने सकाळी 7 वाजल्यापासून 8.45 वाजेपर्यंत हल्ला केला. भारतीय सैन्यानं ही पाकला जोरदार आणि परिणामकारक असं प्रत्युत्तर दिलं.
पाक सैन्याच्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका 10 वर्षाच्या मुलाचा आणि एका महिलेचा समावेश आहे. तर आठ नागरिक जखमी झाल्य़ाची माहिती आहे. जखमींतील काहींना उपचारासाठी जम्मूला नेण्यात आलं आहे.
पाक सैन्याकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, पूंछ सेक्टरमध्ये गोळीबार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Oct 2017 07:33 PM (IST)
पाकिस्तानी सैन्याकडून आज सकाळपासून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु आलं. जम्मू काश्मीरमधील पूंछ भागातील केरनी आणि दिग्वार परिसरात पाक सैन्यानं बेछूट गोळीबार केला. त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर बारामुल्ला सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -