VIDEO : बिटिंग रिट्रीटवेळी पाक जवान जमिनीवर पडला!
एबीपी माझा वेब टीम | 17 Jul 2017 02:10 PM (IST)
भारत-पाक सीमेवरील हुसैनीवालमध्ये रविवारी (16 जुलै) बिटिंग रिट्रीट कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी पाकिस्तानी लष्कराचा जवान उत्साहाच्या भरात जमिनीवर पडला.
नवी दिल्ली : भारत-पाक सीमेवरील वाघा बॉर्डरवर बिटिंग रिट्रीटचा थरार पाहण्यासाठी लाखो नागरीक दररोज सीमेवर जमतात. यावेळी जवानांमध्येही उत्साहाचे स्फूरण चढलेलं असतं. पण रविवारी बिटिंग रिट्रीटदरम्यान पाक जवान अतिउत्साहाच्या भरात परेड करत असताना जमिनीवर पडला. भारत-पाक सीमेवरील हुसैनीवालमध्ये रविवारी (16 जुलै) बिटिंग रिट्रीट कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी पाकिस्तानी लष्कराचा जवान उत्साहाच्या भरात जमिनीवर पडला. यावेळी उपस्थित भारतीयांनी हूटिंग करत, टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने उठून पुन्हा आपले रिट्रीट पूर्ण केलं. पण या चुकीमुळे त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट जाणवत होता. बिटिंग रिट्रीटचा व्हिडीओ पाहा