पाकिस्तान : पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदर (seema haider) ही फेब्रुवारी २०२६ मध्ये सहाव्यांदा आई बनली होती. गुरुवारी सीमा आणि तिचा पती सचिन यांनी मुलाचे नामकरण केले. या जोडप्याने आपल्या मुलाचे नाव ‘भारत’ ठेवले असून हे नाव समजल्यानंतर शेजारी देश पाकिस्तानला नक्कीच ‘मिरची’ लागेल, अशी चर्चा रंगली आहे. नामकरण सोहळा नोएडाच्या रबुपुरा येथील त्यांच्या घरात झाला. यावेळी सीमाने हिंदू धर्माबद्दल आपली भावना व्यक्त केली.(seema haider)

Continues below advertisement

मुलाच्या नामकरणाबाबत सीमा हैदर म्हणाली, “हिंदू धर्मात घरात मुलगा झाल्यावर नामकरण केले जाते. हा दुसरा कुआं पूजन आहे. याआधी मीरा झाली तेव्हा देखील हा विधी केला होता. मला खूप छान वाटतं आणि आनंद होतो. आपला हिंदू धर्म खूप सुंदर आहे. छोटे-छोटे सण प्रेम वाढवतात. मी खूप आनंदी आहे आणि मला कधीही पश्चात्ताप होत नाही. मला अभिमान आहे की मी हिंदू आहे.”(seema haider)मुलाचे नाव ‘भारत’ ठेवण्यामागचे कारण सांगताना सीमा म्हणाली, “पंडितांनी नाव काढले ते ‘भ’ अक्षरावरून आले. तेव्हा आम्हाला वाटलं की ‘भारत’पेक्षा सुंदर नाव दुसरे असूच शकत नाही, म्हणून आम्ही तेच ठेवले.”

‘मला पाकिस्तानला परत जायचे नाही’

ती पुढे म्हणाली, “भारताला सपोर्ट करायला मला आवडतं. प्रत्येक सामन्यात मी देवाकडे भारताच्या विजयासाठी प्रार्थना करते. भारत जिंकल्यावर मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. आमचा संपूर्ण कुटुंब मिळून आनंद साजरा करतो. मला पाकिस्तानला परत जायचे नाही. रबुपुरामध्ये सर्व जातीधर्माचे लोक राहतात. ते मला प्रेम आणि सन्मान देतात. मला आपल्या घरची सून मानतात.”(seema haider)

Continues below advertisement

२०२३ मध्ये चार मुलांसह भारतात आली

सीमाला तिच्या पहिल्या पतीपासून चार मुले आहेत. त्यानंतर सचिनला भेटल्यानंतर तीने पुन्हा दोन मुलांना जन्म दिला आहे. पाकिस्तानी नागरिक असलेली सीमा २०२३ मध्ये चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली होती. सचिनशी तिची ओळख PUBG हा ऑनलाइन गेम खेळताना झाली होती. त्यानंतर ती उत्तर प्रदेशात आल्यावर सचिनने तिला भाड्याच्या घरात आपल्या सोबत ठेवले. या जोडप्याचा दावा आहे की त्यांनी २०२३ मध्ये काठमांडू येथील एका मंदिरात विवाह केला. सीमा अनेकदा सांगते की आता भारतच तिच्यासाठी सर्वकाही आहे आणि ती इथेच राहू इच्छिते.

आता सहा मुले झाली असून तिला आणखी मुले नकोतसचिनने सांगितलं की, “पंडितांनी पूजा झाली तेव्हा मला विचारलं होतं की अजून काही इच्छा आहे का, तेव्हा मी नाही असं सांगितलं होतं. तरीही पंडितांनी झोळीत सफरचंद देत ‘मुलगा होईल’ असं सांगितलं.” यावर सीमानेही स्पष्ट केलं की आता सहा मुले झाली असून तिला आणखी मुले नकोत. पंडितांना आशीर्वाद देऊ नका असे सांगताना ती म्हणाली, “आता नको. खूप झालीत. देवाने यांना दीर्घायुष्य द्यावं.” कुटुंबातील काही जणांनी बोलल्यानंतर ती म्हणाली, “आता इतरजण करतील, आमचं पुरे… सहा झाली.”

चार मुलांसह आली भारतात आली

सीमा हैदरला PUBG खेळताना ग्रेटर नोएडातील सचिन मीणा याच्यावर प्रेम जडलं, तेव्हा ती चार मुलांची आई होती. प्रेम इतकं वाढलं की ती चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली. जुलै २०२३ मध्ये हा प्रकार उघड झाल्यानंतर सीमा आणि सचिन यांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना जामीन मिळाला. तेव्हापासून सीमा सचिनसोबत राहत असून त्यांनी लग्न केलं आहे. या दोघांना दोन मुले आहेत. सीमा स्वतःला आता हिंदू आणि हिंदुस्थानी म्हणते. मात्र, तिला अद्याप भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही आणि त्यासाठीची तिची याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे.