India Pakistan War: भारतीय वायूदलाने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये किमान 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अमित शाह (Amit Shah) यांच्यासह प्रमुख नेतेही उपस्थित होते. या बैठकीवेळी केंद्र सरकारने, 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) मध्ये 100 दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना दिली. भारताच्या या एअर स्ट्राईकमध्ये (Air Strike) किमान 100 दहशतवादी ठार झाले आहेत. हा आकडा जास्तदेखील असू शकतो, असे सर्वपक्षीय बैठकीत सरकारच्यावतीने सांगण्यात आले. 

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी पर्यटकांपैकी पुरुषांना त्यांचा धर्म विचारु वेचून ठार मारले होते. कुटुंबीयांच्यादेखत पुरुषांच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या होत्या. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला दणका दिला होता. भारतीय वायूदलाच्या विमानांनी सीमारेषेवरुन पाकिस्तानच्या दिशेने तब्बल 24 क्षेपणास्त्रं डागली होती.  पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ बेचिराख झाले होते. यामध्ये जैश ए मोहम्मदच्या बहावलपूर येथील मुख्यालयाचाही समावेश होता. भारतीय वायूदलाने अवघ्या 25 मिनिटांत क्षेपणास्त्रांचा मारा करुन 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली होती. या हल्ल्यात कुख्यात दहशतवादी मसूद अजहर याच्या आई, बहिणीसह 14 कुटुंबीयांचा मृत्यू झाला होता. मात्र, मृत्युमुखी पडलेल्या एकूण दहशतवाद्यांचा नेमका आकडा समोर आला नव्हता. पाकिस्तानने आपली लाज जाईल या भीतीने एअर स्ट्राईकमधील मृतांची आकडेवारी समोर आणली नव्हती. मात्र, आता केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरमध्ये किमान 100 दहशतवादी ठार झाले आहेत, असे सांगितले आहे. भारतीय सुरक्षादलांच्यादृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे. 

India vs Pakistan: भारताचे 12 ड्रोन्स पाडल्याचा पाकिस्तानचा दावा

भारताने बुधवारी रात्री पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर हल्ल करण्यासाठी ड्रोन्स पाठवले होते. मात्र, पाकिस्तानी लष्कर हायअलर्टवर असल्याने यापैकी 12 ड्रोन्स पाडण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. लाहोरमध्येही तीन स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पाकिस्तानमध्ये हालचालींना वेग आला आहे.

आणखी वाचा

ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैन्य पाकिस्तानला पुन्हा दणका देणार, एअरफोर्सला सरकारचा फ्री-हँड

पाकिस्तानी नागरिकाकडून आपल्याच सैन्याची पोलखोल, भारताची सर्व 24 क्षेपणास्त्रांचा अचूक लक्ष्यभेद, पाकड्यांची एअर डिफेन्स यंत्रणा फेल