Pahalgam terrorist attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam terrorist attack) 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. BSF जवानांनी सुरक्षा आणि गस्त वाढवली आहे. दरम्यान, BSF ने सीमेवरील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश देखील दिलेत. शेतकऱ्यांनी कुंपणाजवळ लावलेली गव्हाची कापणी दोन दिवसांत पूर्ण करुन शेत खाली करण्याचे आदेश देण्यात आलेत.
पहलगाम हल्ल्यानंतर पंजाबमधील भारत पाकिस्तान सीमेवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सैन्याच्या हालचाली वाढल्या असून गावकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमृतसर, फिरोजपूर, गुरदासपूर, पठाणकोट हे जिल्हे पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यामुळे BSF ने सीमेवरील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. शेतकऱ्यांनी कुंपणाजवळ लावलेली गव्हाची कापणी दोन दिवसांत पूर्ण करून शेत खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सीमेवर सैन्याच्या हालचाली वाढल्या
शेतकऱ्यांनी वेळेत कापणी न केल्यास गेट पूर्णपणे बंद केले जातील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 48 तासांच्या आत आपली कापणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. BSF च्या आदेशानंतर शेतकऱ्यांनी तातडीने कामाला सुरुवात केली आहे. पंजाबमधील पठाणकोट ते फाजिल्कापर्यंत 553 किलोमीटर लांबीच्या सीमेवर सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. BSF जवानांनी बॉर्डर आणि गावांमधील गस्त वाढवली आहे. गावांमध्ये कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास, तात्काळ पोलीस आणि BSF जवानांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. BSF च्या क्विक रिएक्शन टीम्स (Quick Reaction Teams) सक्रिय झाल्या आहेत. बॉर्डरवर कोणतीही हालचाल दिसल्यास, थेट गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फिरोजपूरमधील कालू वाला हे गाव सतलज नदीने तीन बाजूंनी वेढलेले आहे. याच्या एका बाजूला पाकिस्तान आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, भारत-पाक तणावामुळे या गावाला नेहमी सर्वात आधी खाली केले जाते. त्यामुळे येथील नागरिक भयभीत आहेत. ज्या शेतकऱ्यांची जमीन तारेच्या कुंपणाच्या पलीकडे आहे, त्यांना लवकर कापणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
48 तासात गव्हाची कापणी करुन शेत खाली करण्याचे आदेश
पंजाबमधील सीमेलगतच्या गावांमध्ये शेतकऱ्यांना विशेष परवानगी घेऊन शेती करण्याची परवानगी आहे. पीक पेरणी आणि कापणीच्या वेळी BSF जवान त्यांच्यासोबत तैनात असतात. तारेचे कुंपण हे शून्य रेषेच्या खूप आधी आहे. शून्य रेषेवर फक्त खांब (pillar) आहेत. BSF ने शेतकऱ्यांना 48 तासांत गव्हाची कापणी करुन शेत खाली करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुद्वारातून याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. वेळेत कापणी न केल्यास गेट बंद केले जातील, असे सांगण्यात आले आहे. BSF च्या या आदेशामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या: