Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना ठार केल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली .हल्ल्यानंतर सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकी होत आहेत .गेल्या 24 तासात काश्मीर खोऱ्यात सक्रिय दहशतवाद्यांची आणखी चार घरं उडवून दिल्यानंतर काश्मीर खोऱ्यात आता आणखी एक हत्याकांड झाले आहे .(Jammu And Kashmir) जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात काही अज्ञातांनी घरात घुसत एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे .मारला गेलेला व्यक्ती एक सामान्य नागरिक होता .या व्यक्तीचा भाऊ काही वर्षांपूर्वी पाकिस्तानला गेला होता. तो लष्करात सामील असल्याची माहिती ही समोर येत आहे .

Continues below advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीत बंदूकधाऱ्यांनी शनिवारी रात्री उशिरा 45 वर्षीय गुलाम रसूल मगरे याची गोळ्या घालून हत्या केली .त्यामुळे तो गंभीर जखमी झाला .त्यानंतर तात्काळ त्याला उपचारासाठी श्रीनगरच्या एका रुग्णालयात हलवण्यात आले .त्यावेळी तिथेच त्याचा मृत्यू झाला .मृतदेहाचे शवविच्छेदन नंतर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे . 

नागरिकाचा भाऊ पाकव्याप्त काश्मीर

या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात  संयुक्त सुरक्षा दलांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे .जम्मू काश्मीर पोलिसांनी या  गुन्हा हत्येनंतर दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे .या हत्येमागचा हेतू स्पष्ट नसला तरी सुरक्षारक्षकांनी सांगितल्यानुसार,  मृत नागरिक गुलाम रसूल मगरेचा भाऊ नियंत्रण रेषेच्या पलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतो . मोहिद्दीन हा लष्कर ए तैयबा दहशतवादी गटाचा तो सक्रिय सदस्य असल्याचे मानले जात आहे . 

Continues below advertisement

दहशतवाद्यांची घरे पाडली

या आठवड्याच्या सुरुवातीला पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने काश्मीरमध्ये अतिरेकी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे .याच दरम्यान कुपवाडा येथे एका नागरिकाची हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे .सुरक्षारक्षकांनी सुरू केलेल्या या कारवाईत किमान 9 अतिरेक्यांची घरे स्फोटकांचा वापर करून उध्वस्त करण्यात आली आहेत .यात शेकडो संशयतांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय .शनिवारी संध्याकाळपासून या कारवाईअंतर्गतच आणखी 3 दहशतवाद्यांची घरे उध्वस्त करण्यात आली .यात दहशतवाद्यांच्या घरांना उडवून देण्यात आले . यात झेना पुरा सोफीयान येथील अदनान सफीदार बांधीपुरा येथील जामीन अहमद शीर गोजरी  आणि पुलवामा येथील त्राल येथील अमीर नजीरवाणी यांचा समावेश होता .

 

हेही वाचा:

Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांकडून मागे गोळीबार, महिला ओरडतेय; काश्मीरी मुलाने बाळाला वाचवलं, पहलगाममधील अंगावर काटा आणणारा VIDEO