Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने अटारी सीमा बंद केली. आता पाकिस्तानातून येणारे लोक अटारी सीमेवर सतत जमत आहेत, जेणेकरून ते लवकरात लवकर त्यांच्या देशात परतू शकतील. अशातच पाकिस्तानला परतताना एका महिलेने तिची झालेली कोंडी आणि त्रासाबद्दल सांगितले आहे, जे खूपच धक्कादायक आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना, पाकिस्तानातून भारतात आलेल्या एका महिलेने सांगितले की, "मी राजस्थानमधील जोधपूरची आहे. माझे लग्न 10 वर्षांपूर्वी झाले होते आणि मी फेब्रुवारीमध्ये भारतात आली होती. मी इथे भेट देण्यासाठी आली होती पण आता मला निघून जाण्यास सांगण्यात आले आहे. मात्र आता समस्या अशी आहे की माझा पासपोर्ट भारतीय आहे आणि माझी मुले हे पाकिस्तानी आहेत."
महिलेच्या वडिलांनी सरकारकडे केली अपील
महिलेच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीकडे भारतीय पासपोर्ट आहे. पण तिचा पाकिस्तानी पासपोर्ट अद्याप बनलेला नाही. जर भारतातून एक्झिट पासपोर्ट मिळाला नाही तर मोठी समस्या निर्माण होईल. माझी दोन्ही मुले अल्पवयीन आहेत आणि त्यांच्या आईशिवाय ते राहू शकत नाहीत. आम्ही सरकारला विनंती केली की त्यांच्या मुलीला आणि मुलांना भारतात राहण्याची परवानगी द्यावी. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना या महिलेने दुःख व्यक्त केले आहेत. त्या म्हणाल्या की, पहलगाममध्ये जे काही घडले ते खूप चुकीचे होते. निष्पाप लोकांना मारणे हे अजिबात चांगले नाही.
पाकिस्तानातून 450 हून अधिक भारतीय भारतात परतले
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, गेल्या तीन दिवसांत वाघा बॉर्डरवरून 450 हून अधिक भारतीय पाकिस्तानातून मायदेशी परतले आहेत. शनिवारी निघालेल्यांमध्ये 23 भारतीयांचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी येथे सांगितले, जे पीएसएल (पाकिस्तान सुपर लीग) 2025च्या प्रसारण कंपनीचा भाग होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सुमारे 300 भारतीय घरी परतले आणि गुरुवारी सुमारे 100 भारतीय या मार्गाने घरी परतले. ते म्हणाले की, यासोबतच 200 पाकिस्तानी नागरिकही भारतातून घरी परतले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या