Pahalgam Terror Attack :  जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) मोदी सरकारने कडक कारवाईला सुरुवात केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील अटारी-वाघा सीमा बंद (Attari  Wagah Border) करण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केला आहे. तसेच सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचे आणि 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. अनेक उच्च सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की भारत आता पाकिस्तानला होणारी वस्तूंची निर्यात थांबवण्याच्या तयारीत आहे. 2024 मध्ये पाकिस्तानला भारताची निर्यात 1.21 अब्ज डॉलरच्या पाच वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.

भारतातून पाकिस्तानात कोणता माल पाठवला जातो?

दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या विविध प्रकारची फळे आणि भाजीपाला अशा अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांची भारतातून पाकिस्तानात निर्यात केली जाते. यामध्ये बटाटे, कांदे आणि लसूण यांचा समावेश आहे. तसेच डाळ, हरभरा आणि बासमती तांदूळही भारतातून पाकिस्तानात पाठवले जातात. याशिवाय पाकिस्तान भारतातून आंबा, केळी यांसारखी अनेक हंगामी फळे आयात केली जातात.

भारतीय चहा जगभरात प्रसिद्ध, पाकिस्तानात मोठी निर्यात

भारतीय चहा जगभरात प्रसिद्ध आहे. आसाम आणि दार्जिलिंगमधून सुगंधित चहाची पानेही पाकिस्तानात पाठवली जातात. याशिवाय भारत पाकिस्तानला मिरची, हळद, जिरे असे विविध प्रकारचे मसाले पाठवतो. यासोबतच भारतातून पाकिस्तानला निर्यात होणाऱ्या इतर वस्तूंमध्ये सेंद्रिय रसायने, औषधी, साखर आणि मिठाई यांचा समावेश होतो.

पाकिस्तानातून भारतात काय येते?

पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या वस्तूंमध्ये सिमेंट, रॉक सॉल्ट, मुलतानी माती, कापूस, चामडे, काही वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. याशिवाय पेशावरी चप्पल आणि लाहोरी कुर्तेही पाकिस्तानातून भारतात आयात केले जातात.

अटारी मार्ग हा पाकिस्तानसाठी एकमेव जमीन व्यापार मार्ग

अमृतसरपासून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर असलेले अटारी हे भारतातील पहिले लँड पोर्ट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार अटारी-वाघा सीमेवरून होतो, त्यामुळे 120 एकरांवर पसरलेला आणि थेट राष्ट्रीय महामार्ग-1 शी जोडलेला हा चेक पॉईंट व्यापारात, विशेषतः अफगाणिस्तानमधून होणाऱ्या आयातीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

अटारी-वाघा कॉरिडॉरवरील व्यापाराची स्थिती काय?

अटारी-वाघा कॉरिडॉरवरील व्यापारात गेल्या काही वर्षांत अनेक चढ-उतार झाले आहेत. जेथे 2017-18 आणि 2018-19 मध्ये व्यापार सुमारे 4100-4300 कोटी रुपयांचा होता. त्याच वेळी, ते 2019-20 मध्ये 2772 कोटी रुपये आणि 2020-21 मध्ये 2639 कोटी रुपयांपर्यंत खाली आले. 2022-23 मध्ये, व्यापार आणखी घसरला आणि फक्त 2257.55 कोटी रुपये राहिला. तर 2023-24 मध्ये मोठी झेप घेत दोन्ही देशांमधील व्यापार 3886 कोटी रुपयांपर्यंत वाढला. 2023-24 मध्ये या मार्गावरून 6,871 ट्रकने प्रवास केला आणि 71,563 प्रवाशांच्या येजा केल्याच्यी नोंद झाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Fawad Khan Abir Gulaal Movie: पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या 'अबीर गुलाल' सिनेमावर बंदी