Pahalgam Terror Attack :  जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला (Pahalgam Terror Attack) केला आहे. या घटनेत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले आहेत. या अडकलेल्यांना नागरिकांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. यामध्ये श्रीनगरमध्ये अडकलेल्या 47 पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पुढकार घेतला आहे. 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी वैयक्तिक पातळीवर पुढाकार घेत केंद्रीय गृह मंत्रालयाशी समन्वय साधत 47 जणांच्या सुरक्षित स्थलांतराची विशेष रेल्वे व्यवस्था उभी केली आहे. जाधव गुरुवारी सकाळी स्वत: श्रीनगरमध्ये दाखल होऊन अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. आज म्हणजे 24 एप्रिल रोजी पहाटेच्या रेल्वेद्वारे या पर्यटकांना जम्मू येथून भुसावळ व मलकापूर येथे पोहोचविण्यात येणार असल्याचे जाधव म्हणाले. या पर्यटकांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, खामगाव, शेगाव तालुक्यातील अनेकजण असून, राज्यातील इतर भागांतील 20 जणांचा देखील समावेश आहे.

उद्या सर्व पर्यटक भुसावळ-मलकापूर स्थानकांवर पोहोचणार 

अडकलेले सर्व पर्यटक 25 तारखेला सकाळपर्यंत भुसावळ-मलकापूर स्थानकांवर पोहोचणार आहेत. दहशतीच्या छायेतून हे सर्वजण सुखरूप परत येत असल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. अडकलेल्या पर्यटकांमध्ये संजीव, भारती, प्रणव, प्राशु, अनुज, सुप्रिया, आदित्य पुरवार, संदीप, वर्षा, सुपेश, सर्वेश खेडकर, आशिष, दीपाली जैन, अमोल, आरती, श्रेया, देवांश पांढरे, सुरेश, शितल हिंगणे, श्रीकांत, उज्वला, स्वराज महल्ले, विशाल, गंगा धांडे, गजानन, प्रिया, सुयोग काळे, ज्ञानेश्वर, वर्षा इंगळे, निखीलेश, कोमल, ईशानवी बेलोकार, योगेश, श्रद्धा हिरडकर, विष्णू पिवळटकार, मेधा सपकाळ, मंगेश, गोकुळ, अन्वी, मल्हार वैतकार, संजय चौधरी, देव, नारायणी पाटील, शिवम कंडेलवार, मोहन, पुनम, आराध्या दळवी यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या:

Pahalgam Terror Attack : काश्मिरी ड्रायव्हर आदिलनं ना धर्म पाहिला, ना जात पाहिली; त्यानं आपल्या 'मेहमान' मराठी कुटुंबासाठी फक्त माणूसकी पाहिली! संकटात घरी नेत पाहुणचार