Pahalgam Terror Attack Full List of Dead People: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. काल (मंगळवारी 22 एप्रिल) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारताला कधीही विसरता येणार नाही असे दुःख दिले आहे. दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. त्याच वेळी, अनेक जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, युएई, नेपाळ आणि उत्तर प्रदेश-हरियाणा येथील लोकही मारले गेले आहेत. मृतांमध्ये सर्व पुरूषांचा समावेश आहे.

Continues below advertisement

महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात  डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय.  तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.

Continues below advertisement

महाराष्ट्रातील मृतांची नावे-1) अतुल मोने - डोंबिवली2) संजय लेले - डोंबिवली3) हेमंत जोशी- डोंबिवली4)  संतोष जगदाळे- पुणे5)  कौस्तुभ गणबोटे- पुणे6)   दिलीप देसले- पनवेल

जखमींची नावे- 1) एस बालचंद्रू2) सुबोध पाटील3) शोबीत पटेल

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 4 दहशातवाद्यांचे फोटो समोर

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. या निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा फोटो आता समोर आला आहे. पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबार करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा फोटो समोर आला आहे. चौघेही पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून हा कट रचला जात होता. पाकिस्तानातून हे हल्लेखोर त्या ठिकाणी आले होते, त्या ठिकाणी असलेल्या स्लीपर सेलच्या मदतीने या हल्लेखोरांनी हल्ले केले. यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दहशतवाद्यांच्या चेहरा दिसणारा हा पहिला फोटो समोर आला आहे. काश्मिरमधील नागरिकांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांचा हा फोटो समोर आल्याचं दिसून येत आहे.