नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रतिष्ठित पद्म सन्मान पुरस्कारासाठी नामांकन करण्याचे आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट केले आहे की, समाजासाठी विशेष योगदान दिलेली माणसं तुम्हाला माहिती असेल तर त्यांना पद्म पुरस्कारासाठी नामांकीत करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ट्विटरद्वारे लोकांना हे आवाहन केलं आहे. पद्म पुरस्कारासाठी नामांकन देण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट
पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की देशात अशी अनेक माणसं आहेत जी आपल्या मुळांशी जोडली असून विशेष काम करत आहे. त्यांच्या कामाचा फायदा समाजाला होत आहे. परंतु, आम्हाला त्यांच्याबद्दल फारच कमी माहिती आहे. आपण अशा लोकांना ओळखता का? तर तुम्ही त्यांना #PeoplesPadma (लोकांचा पद्म सन्मान) म्हणून नामांकित करा. अशा लोकांची नावे 15 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पाठवता येईल.
पद्म पुरस्कर काय आहे?
पद्म पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे. दरवर्षी देण्यात येणारा हा पुरस्कार तीन प्रकारात दिला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार देणाऱ्यांची नावे जाहीर केली जातात. नामांकन लोक करतात. पात्र व्यक्ती स्वतःचं नावही नामांकीत करू शकतो.
आपण नामांकन पाठवू शकता
- सर्वप्रथम पद्म पुरस्कारांच्या वेबसाइटवर जा त्यासाठी इथं क्लिक करा आणि लॉग इन करून स्वत: ची नोंदणी करा.
- यानंतर New Nomination वर क्लिक करा आणि नामनिर्देशन प्रक्रिया सुरू करा.
- New Nomination वर क्लिक केल्यानंतर पद्म पुरस्कारांच्या विभागात जाण्यासाठी क्लिक करा. यानंतर आपण पद्मविभूषण, पद्मभूषण किंवा पद्मश्री यांना उमेदवारी देऊ इच्छिता की नाही ते ठरवा. ज्याला आपण नामनिर्देशित करू इच्छिता त्याच्यावर क्लिक करा.
- त्यात वेगवेगळ्या श्रेणी असतील. कला, विज्ञान, अभियांत्रिकी, खेळ, सामाजिक कार्य इ. आपण ज्या विभागात काम करत आहात त्या सेगमेंटची निवड करू शकता.
- यानंतर आपण फॉर्ममधील वैयक्तिक माहिती भरा आणि सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करा.
- त्यानंतर आपल्याला आपल्या कामाची माहिती भरावी लागेल. उदाहरणार्थ, आपण किती वर्षे काम केले आणि त्या कार्याचा काय परिणाम झाला. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा.
- जर तुम्हाला यापूर्वी कोणताही सन्मान मिळाला असेल तर त्याबद्दलही माहिती द्या. आपले डॉक्युमेंट PDF स्वरूपात अपलोड करा. त्याचा आकार 5MB पेक्षा कमी असावा. यासह, पुरस्काराचा फोटो देखील अपलोड करावा लागेल ज्याचा आकार 50MB पेक्षा कमी असेल.
- संपूर्ण नामनिर्देशन तपशील भरल्यानंतर आपण अंतिम सबमिट बटणावर क्लिक करू शकता. आपण अंतिम सबमिट करण्यापूर्वी, पुन्हा संपूर्ण तपशील तपासा. कारण एकदा फॉर्म सबमिट झाल्यावर आपण त्यात बदल करू शकत नाही.
- उमेदवारी अर्ज भरण्याविषयीची माहिती ईमेल किंवा एसएमएसद्वारे आपल्याकडे येईल.