Opration Sindhoor Sofiya Qureshi: मध्यप्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह (Vijay Shah) यांनी भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi) यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विजय शाह यांनी एका जाहीर कार्यक्रमात म्हटले की, ज्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसले होते, त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवले की, जेणेकरुन ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या, त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्न करुन सोडेल, असे विजय शाह यांनी म्हटले. विजय शाह यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना मध्य प्रदेशातील भाजप मंत्री विजय शाह यांची जीभ घसरली. विजय शाह यांनी एका कार्यक्रमादरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांचे वर्णन दहशतवाद्यांची बहीण असे केलं. त्यामुळे विजय शाहांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. विजय शाहांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आणि मध्य प्रदेश सरकार विजय शाह यांच्यावर कठोर कारवाई करू शकते, असं शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराकडून कर्नल सोफिया कुरेशी (Col. Sofiya Qureshi) आणि विंग कमांडर व्योमिका सिंह (Wing Commander Vyomika Singh) यांनी सतत पत्रकार परिषद घेत पाकिस्तानचा बुरखा फाडला होता. 

वादग्रस्त विधानानंतर विजय शाह यांनी मागितली माफी-

सोफिय कुरेश यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मंत्री विजय शाह यांनी माफी मागितली आहे. मी दहावेळा माफी मागण्यास तयार आहे. माझ्याकडून चुकून अपशब्द निघाले, असं विजय शाह म्हणाले. माझे संपूर्ण कुटुंब, कुळ लष्करी आहे. माझ्या कुटुंबातील अनेक लोक कारगिल आणि इतर ठिकाणी शहीद झाले, असंही विजय शाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कोण आहे सोफिया कुरेशी? ( Who IS Colonel Sofia Qureshi )

सोफिया कुरेशी या मूळची गुजरातची आहे. सोफिया कुरेशी यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. एका माहितीनूसार सोफियाचे आजोबा देखील सैन्यात होते आणि तिच्या वडिलांनी काही वर्षे सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणूनही काम केले होते. सोफिया यांनी 1999 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाली. सोफिया यांनी 1999 मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतले. 2006 मध्ये, सोफियाने काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले. 2010 पासून त्या शांतता मोहिमेशी संबंधित आहेत. पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रम दरम्यान तिच्या सेवेबद्दल तिला जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी) कडून प्रशंसापत्र देखील मिळाले आहे. ईशान्य भारतातील पूर मदत कार्यादरम्यान तिच्या उत्कृष्ट कामाबद्दल तिला सिग्नल ऑफिसर इन चीफ (एसओ-इन-सी) कडून प्रशंसापत्र देखील मिळाले. कर्नल सोफिया कुरेशी यांनी बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय तुकडीचे नेतृत्व केले तेव्हा त्या देखील चर्चेत आल्या. भारतीय तुकडीचे नेतृत्व करणारी भारतीय लष्करातील सोफिया ही पहिली महिला अधिकारी बनली. या सरावाचे नाव 'एक्सरसाइज फोर्स 18' असे होते. या सरावात कर्नल सोफिया कुरेशी या एकमेव महिला अधिकारी होत्या.

भाजपच्या मंत्र्यांचं सोफिया कुरेशीबाबत वादग्रस्त विधान, VIDEO:

संबंधित बातमी:

Operation Sindoor: चिता अन् चेतक हेलिकॉप्टर्सवर मांड, घातक शस्त्रांवर हात, कठीण मिशन्स यशस्वी, कोण आहेत कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका सिंग?