नवी दिल्ली : नोटाबंदीविरोधात विरोधकांनी देशव्यापी 'आक्रोश' आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 28 नोव्हेंबरला सर्वपक्षीय एकत्रितपणे देशव्यापी आंदोलन करणार आहेत, अशी माहिती माकप नेते सिताराम येचुरी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

नोटाबंदी: 80 % जनतेचा मोदींना पाठिंबा : सर्व्हे


नोटाबंदीविरोधात सर्वपक्षीयांनी मिळून सरकारवर हल्लाबोल करण्याचा निर्धार केला असल्याचं येचुरी म्हणाले. दरम्यान विरोधी पक्षातील खासदारांनी मानवी साखळी करुन संसदेसमोर आंदोलन केलं.

परिस्थिती नियंत्रणात, नोटाबंदीला स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारीच नोटाबंदीच्या मुद्द्यावरुन विरोधकांचा अप्रत्यक्षपणे समाचार घेतला होता. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचं आपल्याकडे काही जणांकडून समर्थन होत आहे. मात्र हे दुर्दैवी आहे, असं मोदी म्हणाले होते.

मोदींनी झापलं नाही, माध्यमांकडून विपर्यास : शिवसेना