India Air Strike On Pakistan, Operation Sindoor VIDEOs: भारताने पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेतला. पाकव्याप्त काश्मीरसह (Pakistan Occupied Kashmir) पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर भारतीय लष्करानं मध्यरात्री जोरदार आक्रमण केलं. दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त (Air Strike On Pakistan) करून 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक (Air Strike Videos) करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.
भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे, या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये 'जैश ए मोहम्मद'चं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.
दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई करत भारताने रात्री उशिरा 1.30 वाजता पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानमधील 4 आणि पीओकेमधील 5 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. हवाई दलाच्या कारवाईचे व्हिडीओ (Air Strike Videos) देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये हवाई दल एकामागून एक दहशतवादी अड्ड्यांवर कसं लक्ष्य केलं? हे स्पष्ट होतं.
पाकिस्तानच्या सीमेत घुसून 'ऑपरेशन सिंदूर' कसं राबवलं गेलं? हे व्हिडीओ म्हणजे, भारताना पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना शिकवलेल्या धड्याचा पुरावा आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, पाहा व्हिडीओ...
भारताचे दहशतवादविरोधी ऑपरेशन 'ऑपरेशन सिंदूर' हे लष्कर, हवाई दल आणि नौदलाचं संयुक्त ऑपरेशन होतं, ज्यामध्ये दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये हवाई दलानं दहशतवादी तळ कसं उद्ध्वस्त केलं, हे स्पष्ट दिसतंय.
भारतीय सैन्याच्या कारवाईत, भारतीय हवाई दलानं पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर लक्ष्य केलं. रात्री 1.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद इथे हे हवाई हल्ले करण्यात आले आहेत.
पाहा व्हिडीओ : चिनकडून गिफ्ट मिळालेल्या पाकच्या लढाऊ विमानाचा भारतीय सैन्याकडून चक्काचूर
महत्त्वाच्या इतर बातम्या :
