India Pakistan War: भारत आणि पाकिस्तान यांच्या सैन्याकडून परस्परांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा सुरु असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली होती. भारताने पाकिस्तानचे सर्व हवाई हल्ले (Air Strike) निष्फळ ठरवल्यानंतर पाकिस्तानने युद्धात अणवस्त्रांचा वापर करण्याबाबत विचार सुरु केल्याची चर्चा होती. पाकिस्तानची नॅशनल कमांड ऑथोरिटी (NCA) ही समिती देशाचा अणवस्त्र कार्यक्रम, नियंत्रण आणि धोरण ठरवण्याचे काम करते. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी या नॅशनल कमांड ऑथोरिटीची बैठक बोलावल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. मात्र, आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यांनी याबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. (India Pakistan Tension Situation)

पाकिस्तानात नॅशनल कमांड ऑथोरिटी (NCA) कोणतीही बैठक झालेली नाही किंवा कोणतीही बैठक बोलावण्यात आलेली नाही. नॅशनल कमांड ऑथोरिटीच्या ताब्यात पाकिस्तानची अणवस्त्रं आहेत. त्यामुळे अशा बातम्या पसरणं अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आपण याबाबत तात्काळ स्पष्टीकरण दिल्याचे ख्वाजा आसिफ यांनी म्हटले. यावेळी ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या धोरणावरही टीका केली. गेल्या अनेक दशकांपासून नद्यांमधील पाणी (Water) सोडताना भारताकडून पाकिस्तानला सांगितले जायचे. आम्ही पाणी सोडतोय, तुमच्या नागरिकांना सतर्क करा, अशी माहिती पाकिस्तानकडून दिली जायची. पण आता पाण्याचा वापर हत्यारासारखा (Weapon) होत आहे, अशी टिप्पणी ख्वाजा आसिफ यांनी केली. नॅशनल कमांड अथॉरिटीची (NCA) स्थापना फेब्रुवारी 2000 मध्ये पाकिस्तानच्या (Pakistan Army) राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने केली होती. त्याचे मुख्यालय इस्लामाबाद येथे आहे. पाकिस्तानच्या संरक्षण धोरणात आणि प्रादेशिक स्थिरतेत हे प्राधिकरण महत्त्वाची भूमिका बजावते.

नॅशनल कमांड ऑथोरिटीच्या मुख्य जबाबदाऱ्या नेमक्या काय?

अणू आणि क्षेपणास्त्र धोरणाच्या मुद्द्यांवर निर्णय घेणे

धोरणात्मक आण्विक शक्ती आणि संघटनांसाठी धोरण निश्चित करणे

अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर देखरेख करणे

एनसीएचे अध्यक्ष आणि सदस्य कोण?

परराष्ट्र मंत्री: इशाक दार

गृहमंत्री: मोहसीन रझा नक्वी

अर्थमंत्री: मुहम्मद औरंगजेब

संरक्षण मंत्रीः ख्वाजा मुहम्मद आसिफ

चीफ ऑफ जॉइंट कॉस्ट कमेटी: जनरल साहिर शमशाद मिर्जा

लष्करप्रमुख- जनरल असिम मुनीर

नौसेना प्रमुखः एडमिरल नवेद अशरफ

वायू सेना प्रमुखः एअर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर

आणखी वाचा

भारताने आक्रमण केलं तर अणुबॉम्ब टाकून सगळं नष्ट करु, पाकिस्तानी पंतप्रधानांच्या विशेष सल्लागाराचा इशारा