Operation Sindoor: भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील 9 दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांच्या छावण्यांवर हवाई हल्ले करत लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटांच्या बालेकिल्ल्यांना बेचिराख केले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आपल्या सैन्याने शौर्य आणि धैर्य दाखवून इतिहास घडवल्याचे सांगत आपल्या सैन्याला हनुमानाची उपमा दिली..'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सैन्याने योग्य उत्तर दिले असून भारतीय सैन्याने आपले शौर्य आणि धैर्य दाखवून एक नवा इतिहास लिहिला आहे.' असंही ते म्हणाले. बीआरओ (बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन) च्या स्थापना दिन समारंभात ते बोलत होते.

कोणत्याही स्थानिक जागेवर लक्ष्य केले नाही: संरक्षणमंत्री 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "भारतीय सैन्याने अचूकता, सतर्कता आणि संवेदनशीलतेने काम केले आहे. आम्ही ठरवलेले लक्ष्य ठरलेल्या योजनेनुसार अचूकतेने नष्ट करण्यात आले आहेत. कोणत्याही नागरी स्थानाला लक्ष्य करण्यात आलेले नाही.  सैन्याने एक प्रकारची अचूकता, सतर्कता आणि मानवताही दाखवली आहे."

"जिन मोही मारा, तीन मोही मारे" या हनुमानाच्या आदर्शाचे पालन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारताने प्रत्युत्तर देण्याचा अधिकार वापरलाय. ते म्हणाले, "आम्ही फक्त त्यांनाच मारले ज्यांनी आमच्या देशातील निष्पापांना मारले. सैन्याने हनुमानासारखा हल्ला केला. मी भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करतो. आम्ही हनुमानजींच्या  "जिन मोही मारा, तीन मोही मारे" या आदर्शाचे पालन केले आहे, जो त्यांनी अशोक वाटिका नष्ट करताना पाळला होता. याचा अर्थ आम्ही फक्त त्यांनाच मारले ज्यांनी आमच्या निष्पापांना मारले." असंही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरु केले आणि पूर्वीसारखेच दहशतवादी प्रशिक्षण तळे उद्ध्वस्त करत चोख प्रत्यूत्तर दिले. आमची कारवाई अतिशय विचारपूर्वक आणि सुनियोजित पद्धतीने करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं. दहशतवाद्यांचं मनोबल तोडण्यासाठी ही कारवाई केवळ त्यांच्या तळांवर आणि पायाभूत सुविधांपुरती मर्यादित होती. मी पुन्हा एकदा  आपल्या सशस्त्र दलाच्या शौर्याला नमन करतो असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

हेही वाचा:

Operation Sindoor: मध्यरात्री 1.05 वाजता पाकिस्तानात घुसले, 1.30 वाजता मिशन पूर्ण केले; 23 मिनिटांत खेळ खल्लास; भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ची A टू Z माहिती