Operation Sindoor : पाकिस्तानला भारतीय लष्कराने आपल्या ताकदीची जाणीव करून दिली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ज्यात पाकिस्तानमधील सर्व दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. आता पाकिस्तान भारताचे काही नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, भारतीय सैन्याने आघाडीची जबाबदारी घेतली आहे. पाकिस्तानने केलेला प्रत्येक हल्ला निष्फळ ठरत आहे. भारतीय सैन्याने या संपूर्ण युद्धाची माहिती देण्याची जबाबदारी दोन महिला अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. ज्यांनी अलीकडेच पुन्हा एकदा ब्रीफिंग दिली आहे. यात त्यांनी पोशाख बदललेला दिसून आला आहे. या ड्रेसचा अर्थ काय आहे? आणि तो कधी घालतात? याबाबत जाणून घेऊयात... 

Continues below advertisement


लढाऊ गणवेशात दिसल्या महिला अधिकारी 


भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्वप्रथम माध्यमांना दिली. त्यावेळी दोन्ही अधिकारी त्यांच्या सर्व्हिस ड्रेसमध्ये असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र,पाकिस्तानकडून हल्ला झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही महिला अधिकारी वेगळ्याच रूपात दिसल्या. यावेळी दोघांनीही पूर्वीपेक्षा वेगळा गणवेश परिधान केला होता. याला लढाऊ गणवेश असे म्हटले जाते.  


लढाऊ गणवेश म्हणजे काय?


सेनेमध्ये "कॉम्बॅट" म्हणजेच लढाई किंवा युद्धसदृश परिस्थिती असते. यावेळी जवान आणि अधिकाऱ्यांची वेगळी युनिफॉर्म असते, जिला "कॉम्बॅट युनिफॉर्म" (लढाऊ गणवेश) म्हटलं जातं. ही युनिफॉर्म अशा प्रकारची असते की जी लांबून सहजपणे दिसत नाही. म्हणजेच, या युनिफॉर्ममुळे जवान लपून राहू शकतात. सामान्यतः जंगलांमध्ये आणि सीमावर्ती भागांमध्ये अशा ड्रेसचा वापर केला जातो.


सर्व्हिस युनिफॉर्म म्हणजे काय?


जेव्हा कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांना लोकांनी पहिल्यांदा एकत्र टीव्हीवर पाहिलं, तेव्हा त्या दोघींही सर्व्हिस युनिफॉर्ममध्ये दिसल्या होत्या. सर्व्हिस युनिफॉर्म म्हणजे सैन्यदलांची सामान्य युनिफॉर्म, जी कार्यालयात किंवा शांततेच्या भागात परिधान केली जाते. तुम्ही जेव्हा सैन्याच्या फोटोंमध्ये सैनिकांना पाहिलं असेल, तेव्हा बहुतांशवेळा त्यांनी हीच युनिफॉर्म परिधान केलेली असते.


तीनही सैन्यदलांसाठी सर्व्हिस युनिफॉर्मचे रंग वेगवेगळे


दरम्यान, भारतीय सैन्याजवळ केवळ एक किंवा दोन नव्हे, तर एकूण 14 प्रकारच्या युनिफॉर्म्स असतात, ज्या वेगवेगळ्या प्रसंगी वापरल्या जातात. यामध्ये उन्हाळी आणि हिवाळी युनिफॉर्म्सचा समावेश आहे. याशिवाय, वेगवेगळ्या रेजिमेंट्समध्येही युनिफॉर्ममध्ये थोडा फरक असतो.



आणखी वाचा 


India Pakistan War : पाकिस्तानसोबत तणाव वाढला, PM मोदींच्या सरकारी विभागांना महत्त्वाच्या सूचना; म्हणाले, ही तर फक्त सुरुवात!