India Pakistan War : पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताविरुद्ध आपल्या नापाक कारवाया करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, उधमपूर, अखनूर, जैसलमेर, जालंधर, फिरोजपूर आणि पोखरणसह अनेक भारतीय भागांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ले केले. मात्र, आपल्या सैन्याने पाकिस्तानचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानचे दोन JF-17 आणि एक F-16 लढाऊ विमान पाडले आहे. तसेच, पाकिस्तानी हवाई दलाचे AWACS विमान त्यांच्याच पंजाब प्रांतात नष्ट करण्यात आले. भारताने S-400 आणि L-70 हवाई संरक्षण प्रणाली वापरून 50 हून अधिक पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली आहेत.
पाकिस्तानने नियंत्रण रेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील (IB) अनेक भागात गुरुवारी रात्री ड्रोन पाठवले होते. परंतु भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे आणि जोरदार तयारीमुळे पाकिस्तानचा हा कट अयशस्वी झाला. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात अनेक ठिकाणी ड्रोन हल्ल्यांद्वारे नुकसान पोहोचवण्याची योजना आखत होता. परंतु भारताच्या आधुनिक हवाई संरक्षण तंत्रज्ञानाने आणि सैनिकांच्या सतर्कतेने त्यांची प्रत्येक हालचाल उधळून लावली.
पाकिस्तानची प्रत्येक क्षेपणास्त्र प्रणाली बेचिराख
पाकिस्तानने डागलेल्या 8 क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करण्यात आले होते. भारताने वेळेवर दिलेल्या प्रत्युत्तरामुळे मोठे नुकसान टळले. तर पाकिस्तानी विमानांनी भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण युनिट्सनी नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान पाडले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुजवर हल्ला केला. या सर्व क्षेत्रांमध्ये, भारताच्या एकात्मिक काउंटर यूएएस ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणालीने उत्कृष्ट समन्वय दाखवला आणि शत्रूचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला. ढिगारा सापडल्याने हल्ल्याची पुष्टी झाली आहे.
S-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम म्हणजे काय?
S-400 ही जगातील सर्वात प्रगत लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक आहे. हे रशियाच्या अल्माझ-अँटे यांनी बनवले आहे आणि भारताच्या स्ट्रॅटेजिक एअर डिफेन्स कमांडमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. हे लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि अगदी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह इतर हवाई धोक्यांचा मागोवा घेण्यासाठी, रोखण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ही हवाई संरक्षण प्रणाली वेगवेगळ्या अंतरावर आणि उंचीवर लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे, ज्यामुळे ती शत्रूच्या हवाई हल्ल्यांविरुद्ध भारताची संरक्षण ढाल राहिली आहे.
आणखी वाचा