'ऑपरेशन बंदर' नावाने बालाकोटवर एअर स्ट्राईक, नौदलही सज्ज होते
एबीपी माझा वेब टीम | 21 Jun 2019 10:51 PM (IST)
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायू सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट प्रांतात एअर स्ट्राईक केला. भारतीय वायू सेनेने राबवलेल्या मिशनबाबत काही माहिती मिळाली आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायू सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट प्रांतात एअर स्ट्राईक केला. भारतीय वायू सेनेने राबवलेल्या मिशनबाबत काही माहिती मिळाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या या माहितीनुसार पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायू सेनेने 'ऑपरेशन बंदर' हाती घेतले होते. या ऑपरेशनचाच एक भाग म्हणून वायू सेनेने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला. रामभक्त हनुमानाने ज्याप्रमाने लंकेत जाऊन रावणाची लंका जाळली होती. त्याचप्रमाणे भारतीय वायू सेना पाकिस्तानमध्ये घुसून 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचे अड्डे उध्वस्त करणार होती. त्यामुळे वायू सेनेने या मिशनला 'ऑपरेशन बंदर' असे नाव दिले होते. याद्वारे वायू सेनेने जैशचे 200 हून जास्त दहशतवादी ठार केले. या ऑपरेशनमध्ये नौदलाचाही सहभाग असणार होता. विशेष म्हणजे नौदलानेदेखील तयारी केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाने 'ट्रोपेक्स' या नावाच्या मिशनची तयारी केली होती. मिशन हाती घेतल्यानंतर भारतीय युद्धनौका आणि पानबुड्यांनी पाकिस्तानकडे वाटचाल सुरु केली होती. बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या मृतदेहांचा खच अजूनही घटनास्थळी पडून | बालाकोट | एबीपी माझा 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामा परिसरात जैशच्या दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या बसवर आदळली. त्यामुळे झालेल्या स्फोटात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 13 दिवसांनी भारतीय वायू सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट प्रातांत हवाई हल्ला करुन जैशचे अड्डे उध्वस्त केले. बालाकोटमध्ये 130 ते 170 दहशतवादी मारले गेले, इटलीच्या पत्रकार मॅरिनो यांचा रिपोर्ट | एबीपी माझा