मुंबई : कर्मचारी भविष्य़ निर्वाह निधीचे (EPFO) सर्व व्यवहार आता ऑनलाईन होणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना ईपीएफओच्या कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. शिवाय, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ईपीएफओमधील रक्कम येत्या मे महिन्यापासून ऑनलाईनच काढता येणार आहे. व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.


येत्या 31 मार्चपर्यंत ईपीएफओ धारकांनी आधार कार्ड किंवा आधार कार्ड क्रमांक ईपीएफओला सादर करावा लागेल. पेन्शन बँक आणि बँक खाती आधार कार्डद्वारे जोडली जाणार आहेत. आधार कार्ड क्रांक जोडला असेल, तरच रक्कम मिळेल.

ईपीएफओची सर्व क्षेत्रीय कार्यालयं केंद्रीय सर्व्हरला जोडण्याचं काम सुरु असून, सर्व प्रकारच्या अर्जांसाठी अर्ज दाखल करण्याची सुविधा दिली जणार आहे. त्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी काढण्यासाठीच्या ऑनलाईन अर्जाचाही समावेश आहे.

ईपीएफओची आतापर्यंत 50 कार्यलयं केंद्रीय सर्व्हरल जोडली असून, अजून 123 कार्यालयं जोडण्याचं काम सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वर्गणीदारांना ऑनलाईन सेवेचा लाभ घेता येणार आहे.