नवी दिल्ली : ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) एचपीसीएल या कंपनीला 44 हजार कोटी रुपयात विकत घेण्याच्या तयारीत आहे. सरकारचं कंपन्यांचं एकत्रिकरण करुन इंधन तयार करण्याचं नियोजन आहे. त्यासाठी ओएनजीसी हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.


ओएनजीसी, इंडियन ऑईल, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, एचपीसीएल आणि भारत पेट्रोलियम लिमिटेड या प्रमुख तेल कंपन्या भारतात आहेत.

दोन्ही कंपन्यांचं एकत्रिकरण केल्याने जास्त तेलनिर्मिती करण्यास मदत होईल. एचपीसीएल ही देशातील प्रमुख तीन कंपन्यांपैकी एक तेल कंपनी आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला जाण्याची माहिती आहे.

एचपीसीएल आणि ओएनजीसीचं एकत्रिकरण केलं जाईल, तर भारत पेट्रोलियम ही कंपनी स्वतंत्र राहिल. त्यामुळे ग्राहकांना एचीसीएल-ओएनजीसी, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तीन कंपन्यांचा पर्याय राहिल.