Omicron New Variant : मागील काही दिवसांमध्ये भारतातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या (CoronaVirus) संख्येत घट पाहायला मिळत आहे. कोरोना संक्रमण (Corona Infection) कमी झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर अनेक राज्यातील निर्बंध हटवण्यात आले आहे. पण अशातच ओमायक्रॉन व्हेरियंटचा आणखी एक नवीन सब व्हेरियंट समोर आला आहे. या नव्या व्हेरियंटने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. अनेक राज्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटची नावे BF.7 आणि XBB अशी आहेत. हे दोन्ही सब व्हेरियंट वेगानं पसरत आहेत. त्यातच भारतामध्ये सणासुदीचा काळ सुरु आहे, ठिकठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट अतिशय वेगानं पसरण्याची शक्यता आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, BF.7 या व्हेरियंटचा रुग्ण गुजरातमध्ये आढळला आहे. त्याचे रिपोर्ट्स रिसर्च सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहेत. ओमायक्रॉनचा नवीन व्हेरियंट चिंतेचा विषय आहे, कारण ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार अतिशय वेगानं होतो. त्यामुळे भारतात आणखी एक कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. दिलासादायक बाब म्हणजे ओमायक्रॉनचा हा व्हेरियंट डेल्टा अथवा इतर व्हेरियंटच्या तुलनेत तितका प्रभावी नाही. पण कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं होऊ शकतो. 


डॉक्टरांच्या सल्ला घ्या - 


तज्ज्ञांच्या मते, सध्या भारतामध्ये सणासुदीचा काळ आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी लोक बाजारात गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमण वेगानं होण्याची शक्यता आहे. या नव्या सब व्हेरियंटचा जास्त धोकादायक नाही, पण लोकांमध्ये वेगानं कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. 


कोरोना आपल्यासोबत कधीपर्यंत राहू शकतो, हे सांगितलं जाऊ शकत नाही. अशात कोरोना नियमांचं पालन करणं हा एकमेव उपाय आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. कम्युनिटी मेडिसिन एक्सपर्ट डॉ सुनीला गर्ग यांच्यानुसार, विषाणूमध्ये म्यूटेशन म्हणजेच बदल होत राहणार. आणखी काही काळ आपल्यासोबत कोरोना राहू शकतो. कोरोना अद्याप पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरं हाच उपाय आहे. त्यासोबत कोरोनाच्या इतर नियमांचे पालन करणंही गरजेचं आहे. 


दरम्यान, मागील दोन ते तीन वर्षांमध्ये कोरोनाचे अनेक व्हेरियंट आणि सब व्हेरियंट आले आहे. कोरोना विषाणूच्या म्युटेशनमुळे नवनवी व्हेरियंट आणि सब व्हेरियंट आले आहे. करोना लस घेतल्यानंतरही संक्रमण झालेय. त्यामुळे कोरोना संपला आहे, असं म्हणता येणार नाही. कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग यासारखे नियम वापरणं गरेचं आहे.