नवी दिल्ली : काश्मीर हा पुन्हा राजकारणाचा आखाडा बनू नये, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीनंतर काश्मीरचे विरोधीपक्ष नेते ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केलं. गेल्या 45 दिवसांपासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यासंदर्भात दिल्लीत आज
महत्त्वपूर्ण बैठक झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मोदींनी योग्य ती कारवाई करण्याबाबत आश्वस्त केलं. विरोधीपक्षांच्या शिष्टमंडळाने काश्मीरात पॅलेट गनच्या वापरावर तात्काळ बंदी आणण्याचीही मागणी केली.
काही दिवसांपूर्वी दहशतवादी बुरहान वाणीचा भारतीय जवानांनी खात्मा केला होता. तेव्हापासून काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरली आहे. बुरहानला दहशतवाद्यांबरोबरच फुटीरतावाद्यांचं बळ मिळालं होतं.