बस कालव्यात कोसळून 10 जणांना जलसमाधी, 18 जखमी
एबीपी माझा वेब टीम | 22 Aug 2016 04:52 AM (IST)
हैदराबाद : तेलंगणातील खम्मम या भागात खासगी बस पुलावरुन कालव्यात पडून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय तर 18 प्रवासी जखमी आहेत. अपघातग्रस्त बस हैदराबादवरुन खम्मम जिल्ह्याकडे चालली होती. त्यावेळी नयाकुंगेडम भागात चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस थेट नागार्जुनसागरच्या कालव्यात कोसळली. बसमध्ये यावेळी 31 प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र 7 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तिघांनी उपचारादरम्यान आपले प्राण सोडले. आणखी 18 प्रवासी जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.