Ola Electric Scooter : ओलाची ई-स्कूटर लवकरच बाजारात येणार असून लॉन्चिंगपूर्वीच त्याचे बुकिंग सुरु करण्यात आलं आहे. ओलाच्या olaelectric.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन केवळ 499 रुपयांत ई-स्कूटर बुक करण्याची संधी कंपनीने दिली आहे. कंपनीच्या वतीनं एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करुन ही माहिती देण्यात आली आहे. 


ओला कंपनीचे चेअरमन आणि सीईओ भाविश अगरवाल यांनी सांगितलं की, भारतात आता इलेक्ट्रिक व्हेईकल रिव्होल्यूशनला सुरुवात झाली आहे कारण आम्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या बुकिंगला सुरुवात केली आहे. 


 






आपल्या या ई-स्कूटरची किंमत किती असेल याची घोषणा कंपनीने अद्याप केली नाही. पण ही किंमत सामान्यांच्या आवाक्यातील असेल असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. जे लोक आता बुकिंग करतील त्यांना विक्रीमध्ये प्राधान्य देणार असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. एक व्यक्ती कितीही गाड्या बुक करु शकतो. आणि आपले बुकिंग कॅन्सल करायचे असेल तर कोणत्याही क्षणी तसे करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. असं केल्यास बुकिंगचे 499 रुपये परत मिळतील असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. 


ओलाने तामिळनाडू राज्यात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी स्थापन केली आहे. त्यासाठी कंपनीकडून 2400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी ओलाने तामिळनाडू राज्य सरकारसोबत एक करार केला आहे. यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या क्षेत्रातील भारताची आयात कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच या गुंतवणुकीमुळे स्थानिक उत्पादनांना वाव मिळणार आहे आणि हजारो नव्या नोकऱ्या निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.


महत्वाच्या बातम्या :