सचिनने नुसतचं सहभाग न घेता मैदानात उतरून त्याने ऑफ रोड ड्रायव्हिंगचा थरार अनुभवला. आपण या खेळात देखील मास्टर ब्लास्टर होऊ शकतो हेही त्याने दाखवून दिले. यापूर्वी सचिनने आपली ऑफ रोड रेसिंगमध्ये कार चालवण्याची हौस विदेशात भागवली होती. सचिनचे गाडयांचे प्रेम सर्वश्रुत आहे. गोव्यात यापूर्वी कार्ट रेसिंग ट्रॅकवर सचिन चौफेर फटकेबाजी करताना दिसला होता.
VIDEO | मास्टर ब्लास्टरची ऑफ रोड ड्रायव्हिंग राईड | एबीपी माझा
सचिन देशात पहिल्यांदाच रविवारी गोव्यात ऑफ रोड रेसिंगसाठी मैदानात उतरला. दक्षिण गोव्यातील केपे येथील पठारावर नैसर्गिक ट्रैकवर सचिन कार घेऊन मैदानात उतरला आणि त्याने आपले लक्ष्य साध्य करत सगळ्यांना चकित केलं. त्यानंतर सहचालक बनून सचिनने आणखी एक थरार अनुभवला जो प्रशिक्षित ऑफ रोड रेसर्सस करतात. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खडयात कार उतरवून ती बाहेर काढण्याचा अनुभव ग्रेट होता असे सचिनने एबीपी माझाशी बोलताना सांगितले.