नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर करदात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोटाबंदीनंतर देशात 91 लाख नागरिकांनी आयकर भरणं सुरु केलं आहे.

2016-17 या आर्थिक वर्षात करदात्यांची संख्या 5.7 कोटी एवढी होती. तर या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला हा आकडा 6.25 कोटींपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. चालू आर्थिक वर्ष म्हणजे 2017-18 मध्ये करदात्यांची संख्या 7 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

नोटाबंदीमुळे करदात्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असा दावा सरकारने अगोदरच केला होता. आता जीएसटी लागू झाल्यानंतरही करदात्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.